नवी दिल्ली, 30 मार्च : फेसबुकच्या मालकीचं असलेलं फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग App इन्स्टाग्राम पुन्हा एकदा डाउन झालं आहे. ट्विटरवर instagramdown असा हॅशटॅगही ट्रेंडिंगमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही WhatsApp, instagram डाउन झालं होतं. आता पुन्हा एकदा इन्स्टाग्राम डाउन झाल्याने ट्विटरवर नेटकऱ्यांनी मिम्सचा पाऊस पाडला आहे. इन्स्टाग्राम डाउन झाल्याने ट्विटरवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
everyone running to twitter to check that it isn’t only their #instagramdown 😂 pic.twitter.com/2J6L1Mgyk2
— Oliver Schofield-Tydalé (@oIivert) March 30, 2021
instagram stops suddenly while opening...😂😂😂😂 again a failure #Instagramcrash #instacrash #instagram #instagramdown
— Shah Vivek (@Svivek_) March 30, 2021
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम डाउन झाल्याने अनेक युजर्सला हे app वापरताना अनेक समस्या येत आहेत. काही युजर्स इन्स्टाग्राम अतिशय हळू लोड होत असल्याने, app मधून मेसेज पाठवण्यात असमर्थ असल्याने आपल्या तक्रारी, समस्या शेअर करत आहेत.
दरम्यान, 19 मार्चलाही whatsapp, facbook, instagram या सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यावेळीही या कोणत्याही सोशल मीडिया साईटवर काहीही पोस्ट होऊ शकत नव्हतं. भारतासह युरोप आणि अमेरिकेत काही ठिकाणी हीच समस्या जाणवल्याचं युजर्सकडून सांगण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा इन्स्टाग्राम डाउन झाल्याने त्याची ट्विटरवर चांगलीच चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post, Social media