Independence day : Jioची धमाकेदार ऑफर! 5 महिन्यापर्यंत डेटा आणि कॉलिंग फ्री

Independence day : Jioची धमाकेदार ऑफर! 5 महिन्यापर्यंत डेटा आणि कॉलिंग फ्री

वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर असणारा प्लॅन लाँच केला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट: रिलायन्स jio ने स्वातंत्र्य दिनानिमित्तानं खास ऑफर्स लाँच केली आहे. वर्क फ्रॉम होम तसंच सर्वात जास्त नेटची आवश्यकता असणाऱ्यांसाठी ही ऑफर खास आहे. यामध्ये ग्राहकांना 5 महिन्यांपर्यंत कॉलिंग आणि डेटा फ्री मिळणार आहे. वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी सगळ्यात मोठा आणि ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर असणारा प्लॅन लाँच केला आहे.

काय आहे या प्लॅनचं वैशिष्य?

या नवीन ऑफरअंतर्गत ग्राहकांना JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट खरेदी करावं लागणार आहे. या Wifiवर विनामूल्य डेटा आणि Jio-to-Jio 5 महिन्यांकरिता कॉलिंग फ्री मिळणार आहे.

JioFi 4G ची किंमत 1,999 रुपये आहे. हे घेतल्यानंतर सुरुवातील कोणताही एक प्लॅन wifiसाठी निवडणं आवश्यक आहे. त्यानंतर 5 महिन्यांपर्यंत तुम्हाला ही सेवा फ्री मिळू शकणार आहे. यामध्ये सिमकार्ड टाकल्यानंतर एक तासात अॅक्टीवेट होईल. सगळी प्रक्रिया ग्राहकांना पूर्ण करावी लागणार आहे. हे डिव्हाइस jio च्या वेबसाइट वरून रिलायन्स डिजिटल अथवा ऑनलाइन घेता येणार आहे.

हे वाचा-गेमिंग वेबसाइटपासून सावधान! एका क्लिकमुळे होऊ शकते मोठी फसवणूक

jio wifi सर्वात स्वस्त प्लॅन 199 रुपयांचा आहे. ज्यामध्ये 1.5 GB डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. अतिरिक्त 99 रुपये देऊन ग्राहकांना प्राइम मेंबरशिप घ्यावी लागेल. यासाठी आपल्याला विनाइंटरनेट 1.5 GB डेटा, Wifi फ्री कॉलिंग, 28 दिवसांसाठी ऑफनेट कॉलिंग इतर नेटवर्कसाठी मिळणार आहे. 140 दिवस 100 SMS मिळणार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 15, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या