नवी दिल्ली, 1 डिसेंबर : स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने आपल्या स्मार्टफोनच्या G सीरीजमधील नवा फोन Moto G 5G भारतात लाँच केला आहे. हा भारतातील सर्वांत स्वस्त 5G फोन आहे. फ्लिपकार्टवर (Flipcart) 7 डिसेंबरपासून याची विक्री सुरू होणार आहे. युरोपियन बाजारपेठेत लाँच केल्यानंतर काही आठवड्यांनी भारतात हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनला तीन कॅमेरे असून, 5000mAh बॅटरी आहे. हा फोन व्होल्कॅनिक ग्रे (Volcanic Grey)आणि फ्रॉस्टेड सिल्व्हर (Frosted Silver)अशा दोन रंगात फोन उपलब्ध आहे.
भारतात Moto G 5G ची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. Moto G 5G फोन 6GB 128GB मध्ये उपलब्ध आहे. 7 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर याचा सेल सुरू होणार असून, अवघ्या 2334 रुपयांच्या नो कॉस्ट इएमआयची सुविधाही देण्यात आली आहे. त्याशिवाय 14,300 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास, 1 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. एसबीआय, फ्लिपकार्ट, ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड्सवरही 5 टक्के सूट आहे.
या नवीन Moto G 5G फोनमध्ये 6.7 इंची HD स्क्रिन देण्यात आली असून, LTPS डिस्प्ले आहे. अँड्रॉईड 10 सिस्टीमवर हा फोन चालतो. octa-core Qualcomm Snapdragon 750G SoC,6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.
फोनला ट्रिपल रियर कॅमेरा एलइडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सेलचा, 8 मेगापिक्सेल वाईड अँगल शूटर आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. ऑटो स्माईल कॅप्चर, स्मार्ट काम्पोझिशन, शॉट ऑप्टिमायजेशन, नाईट व्हिजन, हाय-रेझ झूम, एचडीआर, एआर स्टीकर्स, मॅन्युअल मोड, पोर्ट्रेट मोड असे अनेक फीचर्स आहेत.
त्याशिवाय, 5G, NFC, Bluetooth 5.1, Wi-Fi 802.11ac, आणि GPS आहे. Moto G 5G मध्ये 5000 mAh ची बॅटरी असून, USB Type-C port, 20W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सुविधा, फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.