Home /News /technology /

जगातील सर्वात स्वस्त JioPhone Next ची विक्री होतेय सुरू, केवळ 500 रुपयात करा बुक

जगातील सर्वात स्वस्त JioPhone Next ची विक्री होतेय सुरू, केवळ 500 रुपयात करा बुक

हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असणार आहे. गुगल आणि जिओने एकत्र येऊन हा फोन बनवला गेला आहे. कमी बजेटचा 5G स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी जिओफोन नेक्स्ट चांगला पर्याय असणार आहे.

  नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : देशभरातील वापरकर्ते 'जिओफोन नेक्स्ट'ची (JioPhone Next) आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असणार आहे. गुगल आणि जिओने (google jio phone price) एकत्र येऊन हा फोन बनवला गेला आहे. कमी बजेटचा 5G स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी जिओफोन नेक्स्ट चांगला पर्याय असणार आहे. हा फोन 10 सप्टेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोनच्या तुलनेत जिओफोन नेक्स्ट सर्वात परवडणारा फोन असणार आहे.  JioPhone Next च्या नियमित खरेदी व्यतिरिक्त कंपनी लोकांना वेगवेगळे पर्याय देऊ इच्छिते, ज्याद्वारे या फोनची विक्री वाढवण्यास मदत होईल. यातील एक पर्याय म्हणजे JioPhone Next 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्री-बुक करता येईल. JioPhone Next चे विक्री मॉडेल अतिशय सोपे असेल. या फोनसाठी वन टाईम पेमेंट तर उपलब्ध केले जाईलच. परंतु जिओ कंपनीची इच्छा आहे की ग्राहकांनी हा फोन कोणत्याही किंमतीत खरेदी करावा. त्यासाठी जिओ कंपनी ग्राहकांना पूर्ण रक्कम न देता सुरुवातीला काही पैसे देऊन JioPhone Next खरेदी करण्याचा पर्याय देण्यावर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, जिओफोन नेक्स्ट हा दोन मॉडेलमध्ये उपलब्ध केला जाईल. जिओफोन नेक्स्टचे बेसिक मॉडेल 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीला असेल असेल. तर जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्स मॉडेलची किंमत सुमारे 7,000 रुपये असेल. ज्यांना हा फोन खरेदी करायचा आहे ते 500 रुपये भरून हा फोन बुक करू शकतात. प्री बुकिंगसाठी फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागेल. तुम्हाला बेसिक मॉडेलसाठी 500 रुपये आणि अॅडव्हान्स मॉडेलसाठी 700 रुपये द्यावे लागतील. उर्वरित पेमेंट बँक किंवा कर्ज भागीदारासह हप्त्यांद्वारे केले जाऊ शकते. हप्त्यांद्वारे पेमेंट केल्यानंतर त्यावर व्याज आहे की, नाही याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही. बर्‍याच अहवालांनुसार असे कळले आहे की, जिओफोन नेक्स्टची सुरुवातीची किंमत 5,000 च्या जवळपास असू शकते. तर एका ट्विटर युजरने दिलेल्या माहितीनुसार जिओफोन नेक्स्टची सुरुवातीची किंमत 3,499 रुपये असू शकते. हे वाचा - खराब झालेल्या इयरफोन्सचा 'असाही' करता येतो वापर... तुम्ही विचारही केला नसेल!
  जिओफोन नेक्स्टची नेमकी किंमत अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. पण कंपनीने यावर जोर दिला आहे की JioPhone Next हा जगातील सर्वात स्वस्त Android स्मार्टफोन असेल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही जिओफोन नेक्स्टच्या लॉन्च कार्यक्रमादरम्यान जाहीर केले की, अँड्रॉईड पुढील पिढीला परवडणारे हँडसेट तयार करेल. याची सुरूवात JioPhone Next ने होईल. 10,000 कोटींपर्यंत व्यवसाय करण्याचे लक्ष्य एका अहवालानुसार, रिलायन्स जिओ वेगवेगळ्या भारतीय पेमेंट पद्धतींद्वारे JioPhone Next विकण्याच्या तयारीत आहे. अनेक भारतीय बँका आणि कर्ज देणाऱ्या कंपन्यांशी भागीदारी करत आहे. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ स्टेट बँक ऑफ इंडिया, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट अॅश्योर आणि डीएमआय फायनान्स यांच्याशी करार करू शकते. कंपनीने जिओफोन नेक्स्टसाठी सहा महिन्यात 10,000 कोटींपर्यंत व्यवसाय करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Mobile Phone, Reliance Jio, Reliance Jio Internet

  पुढील बातम्या