Home /News /technology /

मोबाईल अ‍ॅप वापरण्यातही भारतीय आघाडीवर, जगभरात Tiktok आणि Tinderला सर्वाधिक प्राधान्य

मोबाईल अ‍ॅप वापरण्यातही भारतीय आघाडीवर, जगभरात Tiktok आणि Tinderला सर्वाधिक प्राधान्य

कोरोनाच्या काळात अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोनवरील अ‍ॅपवर नागरिक अधिक वेळ घालवत असल्याचं समोर आलं आहे. भारतीय नागरिकांनी यामध्ये सर्वाधिक वेळ घालवला असून त्यांनी नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांशी ऑनलाईन अधिक संवाद साधल्याचं यामधून समोर आलं आहे

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 ऑक्टोबर: कोरोनाच्या संकटकाळात अनेक जण घरून काम करत (Work From Home) आहेत. पण या काळात देखील मोबाईल अ‍ॅप वापरण्याचं प्रमाण कमी झालेलं दिसून येत नाही. Annie हे data analytics फर्म app मोबाईल अ‍ॅपवर माणसं किती वेळ घालवत आहेत याचं सर्वेक्षण करते. या फर्मच्या सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या काळात अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोनवरील अ‍ॅपवर नागरिक अधिक वेळ घालवत असल्याचं समोर आलं आहे. भारतीय नागरिकांनी यामध्ये सर्वाधिक वेळ घालवला असून त्यांनी नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांशी ऑनलाईन अधिक संवाद साधल्याचं यामधून समोर आलं आहे. 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये या वापरामध्ये 25 टक्के वाढ झाली. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत 180 अब्ज तासांचा वापर वाढला आहे. भारतात गेल्या वर्षीच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षी अ‍ॅप वापरात 30 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अ‍ॅप्सच्या वापरात अमेरिकेत 15 टक्के तर इंडोनेशियामध्ये 40 टक्के वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या कालावधीत नागरिकांनी विविध प्रकारच्या सोशल मीडिया अ‍ॅपवर वेळ घालवला आहे. जगभरात नागरिकांनी सर्वाधिक वेळ हा टिंडर या डेटिंग अ‍ॅपवर घालवला असून त्यानंतर टिकटॉकचा क्रमांक लागतो. (हे वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीनंतर देखील भारतात सोन्याचांदीला झळाळी, वाचा नवे दर) भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली असली तरीदेखील सोशल मीडियावरील अ‍ॅपवर वेळ घालवण्याच्या बाबतीत भारतीय आघाडीवर आहेत. त्याचबरोबर भारतीय केवळ या अ‍ॅपवर वेळ घालवण्यात आघाडीवर नसून प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 28 अब्ज डॉलर इतकी रक्कम जगभरातील नागरिकांनी ही अप खरेदी करण्यासाठी खर्च केली आहे. गेमिंग अ‍ॅप मोठ्या प्रमाणत वापरले जात आहेत. तर अपल अ‍ॅप स्टोअरवर इतर अप्ससाठी 35 टक्के आणि गुगल प्ले स्टोअरवर 20 टक्के वेळ घालवल्याचं दिसून येत आहे. (हे वाचा-SBI अलर्ट! या तारखांना नाही वापरता येणार YONO SBI APP, बँकेने पाठवला मेसेज) या सर्व्हेमध्ये नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवर गेम अ‍ॅप्स बरोबरच सोशल आणि एंटरटेनमेंट च्या कॅटेगरीमध्ये देखील सर्वाधिक वेळ घालवल्याचं समोर आलं आहे. तर iOS अ‍ॅप स्टोअरवर गेम अ‍ॅप्स बरोबरच एंटरटेनमेंट आणि फोटो, व्हिडिओच्या अ‍ॅप्समध्ये सर्वाधिक वेळ घालवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या सगळ्यात टिंडर अ‍ॅप (Tinder) पहिल्या क्रमांकावर असून कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपची मोठी मागणी असल्याचं समोर येत आहे. तसेच फेसबुकचा वापर या कालावधीत मोठ्या प्रमाणात झाला असून त्या पाठोपाठ WhatsApp, Messenger आणि Instagram चा वापर झाला आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतात आणि बाझीलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून सर्वाधिक अ‍ॅप्स डाउनलोड करण्यात आली असून अमेरिकेत आणि चीनमध्ये अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरून मोठ्या प्रमाणात अ‍ॅप डाउनलोड करण्यात आले आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Mobile, Work from home

    पुढील बातम्या