नवी दिल्ली, 9 एप्रिल : कोरोना महामारी काळात (Coronavirus Pandemic) अधिकतर लोक घरातच आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा दिली आहे. अशात अनेक लोक मोबाईलवर विविध अॅप्सवर (Apps) आपला वेळ घालवत असल्याचं समोर आलं आहे. पण हे माहितेय का की असे कोणते अॅप्स आहेत, ज्याचा वापर भारतीयांकडून सर्वाधित केला जात आहे. IANS च्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा झाला आहे.
रिपोर्टमध्ये 2019 या वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये भारतीयांनी जवळपास 80 टक्के वेळ अॅप्सवर घालवला आहे. जगभरात सरासरी 4.2 तास लोक अॅप्सचा वापर करतात, जो गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे.
भारतात लोकांनी चार-चार तासांचा वेळ अॅप्सवर घालवला -
भारतात अॅप्सवर वेळ घालवण्याचा प्रकार सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. युजर्सनी 2019 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत, 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक वेळ अॅप्सवर घालवला. या वर्षात जानेवारी ते मार्चपर्यंतच्या काळात अमेरिका, तुर्की, मेक्सिको आणि भारतातील युजर्सनी चार-चार तास अॅप्सवर घालवले. तर ब्राझील, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियामध्ये हा वेळ पाच तासांहूनही अधिक आहे.
अॅप अॅनालिटिक्स फर्म अॅप Annie ने गुरुवारी एका रिपोर्टमध्ये सांगितलं की, आता आपण अशा वेळेत राहतो आहोत, जिथे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अशात लोकांचं अधिक लक्ष अशा विविध अॅप्समध्ये असणं साहाजिक असल्याचं सांगण्यात आलं.
Signal आणि Telegram ची अधिक चर्चा -
IANS ने दिलेल्या माहितीनुसार, 2021 च्या पहिल्या तिमाहीमधील नवीन आकड्यांनुसार लोक आता पूर्वीपेक्षा अधिक काळ अॅप्सवर घालवतात. जानेवारी आणि मार्च या काळात लोकांनी Apple App Store आणि Google Play Store वरुन जे अॅप सर्वाधिक वेळा डाउनलोड केले आहेत, ज्यावर लोकांनी अधिक वेळ घालवला आहे त्यात, TikTok, YouTube आणि Facebook प्रमुख आहे. तसंच पश्चिमी बाजारात Signal आणि Telegram चा बोलबाला पाहायला मिळाला.
भारतात टिकटॉकला पर्यायी अॅपच्या रुपात MX Takatak हेदेखील जानेवारी ते मार्चपर्यंतच्या तिमाहीमध्ये अधिक वापरात होतं. डाउनलोड चार्टमध्ये TikTok अव्वल असून, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फेसबुक आणि तिसऱ्या क्रमांकावर इन्स्टाग्राम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.