नवी दिल्ली, 24 डिसेंबर : Fesschain नावाच्या एका भारतीय स्टार्टअपने ब्लॉकचेन पावर्ड स्मार्टफोन (Blockchain Powered Smartphone) Inblock लाँच केला आहे. 1 जानेवारीपासून भारतात याची विक्री सुरू होणार आहे. हा फोन ऑनलाईन किंवा ऑफलाईन रिटेल स्टोरमधूनही खरेदी करता येणार आहे.
Fesschain ने तीन स्मार्टफोन मॉडेल्स E10, E12 आणि E15 लाँच केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये एकही पार्ट चीनचा नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लोकल फॉर वोकलअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 4999 रुपयांपासून सुरू होते आणि याच्या टॉप वेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. कंपनीच्या स्मार्टफोन लाँचदरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रीही सामिल होते.
या कंपनीचे फाउंडर आणि सीईओ दुर्गा प्रकाश त्रिपाठी यांनी सांगितलं की, भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये 89 टक्के मार्केट शेअर नॉन इंडियन कंपन्यांचं आहे. कंपनीकडे 10 लाख फोन तयार करण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले.
We are happy to collaborate as knowledge partners with @Inblockmobiles, India’s first-ever #blockchain based smartphone.
Inspired by @PMOIndia’s #VocalForLocal @fesschain decided to cater to the #Indian #smartphone demands by becoming self-reliant. pic.twitter.com/lCNTqdKLu6
— BlockchainedIndia (@blockchainedind) December 21, 2020
InBlock E12 फोनला डुअल कॅमेरा देण्यात आला असून याची किंमत 7,449 रुपये आहे. दुसऱ्या E10 मध्ये तीन वेरिएंट असणार आहेत, बेस वेरिएंटमध्ये 1 GB रॅम, 16 GB स्टोरेज देण्यात आलं असून याची किंमत 4999 रुपये आहे. दुसऱ्या वेरिएंटमध्ये 2GB रॅम - 16GB मेमरीसह याची किंमत 5999 आहे. तर तिसऱ्या वेरिएंटमध्ये 3GB रॅमसह 32GB स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनची किंमत 6449 रुपये आहे.
कंपनीकडून या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.