भारतीय कंपनीचा जगातला पहिला कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर फीचर फोन लाँच

भारतीय कंपनीचा जगातला पहिला कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर फीचर फोन लाँच

कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर (contactless thermometer)फीचरद्वारे स्पर्श न करता, कोणात्याही व्यक्तीच्या शरीराचं तापमान मोजता येणार आहे. याफोनची किंमत केवळ 1999 रुपये इतकी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : स्मार्टफोन निर्माता स्वदेशी कंपनी 'लावा'ने (LAVA) आपला 'लावा पल्स 1' (Lava Pulse 1) फोन लाँच केला आहे. या फोनचं वैशिष्ट म्हणजे यात, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर फीचर देण्यात आलं आहे. कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर (contactless thermometer)फीचरद्वारे स्पर्श न करता, कोणात्याही व्यक्तीच्या शरीराचं तापमान मोजता येणार आहे. याफोनची किंमत केवळ 1999 रुपये इतकी आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, शरीराचं तापमान मोजण्यासाठी 'लावा पल्स 1' मध्ये असणारा सेंसर काही अंतरावर ठेऊन डोकं किंवा हात जवळ घेऊन गेल्यास, काही सेकंदामध्ये, शरीराचं तापमान समजण्यासाठी मदत होणार आहे. फोनचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे, यात 10 तापमान रीडिंग सेव्ह करण्याचीही सोय आहे. तापमान चेक केल्यानंतर, त्याचं रीडिंग इतरांशी मेसेजद्वारे शेअरही करता येणार आहे.

लावा इंटरनॅशनलचे प्रोडक्ट हेड तेजिंदर सिंह यांनी सांगितलं की, जे लोक अधिक किंमतीचे कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर खरेदी करण्यास सक्षम नाही, ज्यांच्याकडे डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

(वाचा - दिवाळीत या अ‍ॅपवरून 1 रुपयांत खरेदी करता येणार सोनं; फिजिकल डिलिव्हरीचाही पर्याय)

हा हँडसेट मिलिट्री-ग्रेड सर्टिफाईड आहे. या फोनला 2.4 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच फोन मजबूत पॉलीकार्बोनेट शीटपासून बनवण्यात आला आहे. त्याशिवाय फोनच्या इतर फीचर्समध्ये टॉर्च, वीजीए VGA कॅमेरा, 32 जीबीपर्यंत एक्सपेंडेबल मेमरी आहे.

फोनमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी फोटो आयकॉन, रेकॉर्डिंग, वायरलेस एफएम, डुअल सिम सपोर्टचीही सुविधा आहे. फोनला ऑटो कॉल रेकॉर्डिंगसह, टायपिंगसाठी सात भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 28, 2020, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या