Home /News /technology /

Indian Railways: IRCTC बदलणार तिकीट बुकिंगची प्रक्रिया, असा होणार फायदा

Indian Railways: IRCTC बदलणार तिकीट बुकिंगची प्रक्रिया, असा होणार फायदा

IRCTC ने आता तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत बदल करण्याची तयारी केली आहे. पुढील वेळी रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताना IRCTC तुमच्याकडून पॅन किंवा आधार, पासपोर्टची माहिती मागू शकतं.

  नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : तिकीट बुकिंग करताना IRCTC अकाउंटमधून महिन्याला 6 तिकीट बुक करता येतात. याहून अधिक तिकीट बुक करण्यासाठी आपलं अकाउंट Aadhaar शी लिंक करावं लागतं. पण आता तिकीट बुकिंगची पद्धत बदलणार आहे. आता केवळ एका तिकीटासाठीही आधारचे डिटेल्स मागितले जाऊ शकतात. आयआरसीटीसीने आता तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत बदल करण्याची तयारी केली आहे. पुढील वेळी रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करताना IRCTC तुमच्याकडून पॅन किंवा आधार, पासपोर्टची माहिती मागू शकतं. रेल्वे तिकीटच्या दलालांना तिकीट बुकिंग सिस्टममधून बाहेर करण्यासाठी IRCTC हे पाउल उचलत आहे. IRCTC एका नव्या सिस्टमवर काम करत आहे, ज्यात तुम्हाला तुमचं आधार-पॅन लिंक करावं लागेल. IRCTC ची वेबसाईट किंवा App द्वारे तिकीट बुक करण्यासाठी ज्यावेळी लॉगइन कराल, त्यावेळी आधार, पॅन किंवा पासपोर्ट नंबर टाकावा लागू शकतो. रेल्वे संरक्षण दल (RPF) चे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितलं, की रेल्वे IRCTC सह आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यापूर्वी फसवणुकीविरोधात कारवाई होत होती, ती ह्युमन इंटेलिजेंसवर आधारित होती. परंतु याचा परिणाम अधिक होत नव्हता. त्यामुळे आम्ही तिकीटासाठी आता लॉगइन करताना तिकीट बुकिंग अकाउंट पॅन किंवा आधार किंवा इतर डॉक्युमेंट्ससह लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तिकीट बुकिंगवेळी होणारे फ्रॉड रोखण्यास मदत होईल.

  Online Railway Ticket बुक करताना येतेय समस्या? घरबसल्या काही सेकंदात करा बुकिंग

  आधार प्राधिकरणासोबत काम पूर्ण झाल्याचं ते म्हणाले. संपूर्ण सिस्टम काम करण्यासाठी तयार झाल्यानंतर ही नवी सिस्टम सुरू केली जाईल. 2019 ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दलालांविरोधात कारवाई सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत 14,257 दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 28.34 कोटी नकली तिकीट पकडण्यात आले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या