नवी दिल्ली, 17 एप्रिल : रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये तिकीट
(Railway Ticket) आणि बर्थबाबत
(Railway Seat Berth) मोठी समस्या असते. अनेकांना काही समस्यांमुळे लोअर बर्थ हवा
(Lower Berth) असतो. पण तो खात्रीशीरपणे मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे हे त्रासदायक ठरू शकतं. जर तुम्हालाही प्रवासावेळी कन्फर्म, खात्रीशीर लोअर बर्थ हवा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
भारतीय रेल्वेकडून
(Indian Railway) ट्रेनमध्ये प्रवासावेळी सीनियर सिटिजन्सला
(Senior Citizen) लोअर बर्थसाठी प्राथमिकता दिली जाते. पण अनेकदा सीनियर सिटिजनला ही बर्थ मिळत नाही. त्यामुळे प्रवास त्रासदायक ठरतो. पण आता याबाबत चिंता करण्याची गरज नाही. IRCTC ने तुम्हाला कन्फर्म लोअर बर्थ कसा मिळेल याबाबत माहिती दिली आहे.
ट्विटरवर एका प्रवाशाने भारतीय रेल्वेला हा प्रश्न विचारला होता आणि हे योग्यरित्या केलं जावं अशी मागणीही केली होती. प्रवाशाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत लिहिलं, की 'सीट अलॉटमेंटचा काय प्रकार आहे. मी तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थसाठी तिकिटं बुक केली. त्यावेळी 102 बर्थ उपलब्ध होत्या. तरीही त्यांना मिडल बर्थ, अप्पर बर्थ, साइड लोअर बर्थ देण्यात आला. यात सुधारणा व्हावी' असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांच्या या ट्विटवर रेल्वेनेही उत्तर दिलं आहे.
IRCTC ने काय दिलं उत्तर -
IRCTC ने ट्विटरवर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 'लोअर बर्थ/ सीनियर सिटीजनचा कोटा बर्थ केवळ 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी, 45 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील महिलांसाठी लोअर बर्थ आहे ज्यावेळी त्या एकट्या किंवा दोन प्रवाशांसह प्रवास करतात. जर दोनहून अधिक ज्येष्ठ नागरिक किंवा एक ज्येष्ठ नागरिक असेल आणि दुसरा ज्येष्ठ नागरिक नसेल, तर सिस्टम यावर विचार करत नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.