'आओ करें चीनी कम'; Micromax आत्मनिर्भर भारत अंतर्गत 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार स्मार्टफोन

'आओ करें चीनी कम'; Micromax आत्मनिर्भर भारत अंतर्गत 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार स्मार्टफोन

कंपनीने एक नवा व्हिडिओ शेअर केला असून त्यातून Aao Karein Cheeni Kum असा मेसेज देण्यात आला आहे. यामुळे आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत बजेट फोनची सीरीज लवकरच बाजारात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भारतातील स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी नव्या 'In' ब्रँडअंतर्गत भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा वापसी करणार असल्याचं सांगितलं होतं. कंपनीचे सीईओ आणि को-फाउंडर राहुल शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर करत, मोबाईल मार्केटमध्ये कमबॅकची घोषणा केली होती.

राहुल शर्मा यांनी 2 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ते कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत होते. व्हिडिओमध्ये त्यांनी त्यावेळची परिस्थिती सांगितली, ज्यावेळी चीनी स्मार्टफोन कंपन्यांनी बाजारात कब्जा केला होता. त्यामुळे Micromax कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत मोठी घसरण झाली होती. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली, त्यावेळी पुन्हा यावर काम करण्याचा निर्णय घेतला, असल्याचं राहुल शर्मा यांनी सांगितलं.

(वाचा - 90 डिग्रीपर्यंत फिरतो या अनोख्या स्मार्टफोनचा डिस्प्ले; 28 ऑक्टोबरला भारतात होणार लाँच)

आता मायक्रोमॅक्स 'In' सीरीजचे स्मार्टफोन 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीने एक नवा व्हिडिओ शेअर केला असून त्यातून 'आओ करे चीनी कम' (Aao Karein Cheeni Kum) असा मेसेज देण्यात आला आहे. यामुळे आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत बजेट फोनची सीरीज लवकरच बाजारात येणार आहे.

(वाचा - Jio Phone युजर्ससाठी खास अ‍ॅप लाँच; हजारोंची बक्षिसं जिंकण्याची संधी)

कंपनीच्या आगामी सीरीजबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र टिप्स्टर सुमुख राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोमॅक्सचे In-सीरीज स्मार्टफोन 7000 ते 15000 रुपयांपर्यंत लॉन्च केले जातील. हे स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉईडसह नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशात लॉन्च केले जाणार आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: October 24, 2020, 10:07 AM IST
Tags: smartphone

ताज्या बातम्या