Elec-widget

मोबाइल रिचार्ज महागले तरी सरकार म्हणते स्वस्तच!

मोबाइल रिचार्ज महागले तरी सरकार म्हणते स्वस्तच!

Jio, Vodafone-Idea, Airtel या कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले असून यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : मोबाइल रिचार्ज महागणार असल्याने आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओने त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांनी 50 टक्के तर जिओने 40 टक्के दरवाढ केली आहे. मात्र, तरीही देशात इंटरनेट स्वस्त असल्याचं माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी ट्विटरवरून सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने मोबाईल इंटरनेटच्या किंमती कमी केल्या आहेत. भारतात मोबाइल इंटरनेट डेटाची किंमत जगात सर्वात कमी आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार भारतीयांना प्रत्येक जीबीसाठी 11.78 रुपये मोजावे लागतात.

टेलिकॉम कंपन्यांनी मंगळवार 3 डिसेंबरपासून टेरिफ चार्जमध्ये 50 टक्के वाढ करण्याचे जाहीर केलं आहे. यात व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे. तर जिओनेसुद्धा प्रीपेड शुल्कात वाढ करण्याच निर्णय घेतला असून 6 डिसेंबरपासून 40 टक्के दर वाढवण्याची घोषणा केली आहे.

Loading...

आता टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाने सर्वच रिचार्जचे दर 40 ते 50 टक्क्यांनी वाढणार आहेत. तसेच महिनाभऱ कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी आता महिन्याला लागणाऱ्या 28 रुपयांच्या रिचार्जमध्येही वाढ झाली आहे. आता यापुढे किमान 49 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.

एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील असं म्हटलं आहे. तसेच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

सर्वात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या जिओनेही 40 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. नव्या प्लॅनमधून ग्राहकांना 300 टक्के जास्त लाभ देऊ असा दावा जिओने केला आहे. ऑल इन वन प्लस या प्लॅनमध्ये अनलिमिटेल कॉलिंग आणि इंटरनेट दिलं जाईल असंही जिओने म्हटलं आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने कॉलिंगमध्ये प्रतिमिनीट 6 पैसे दरवाढ केली आहे. यामुळे कंपनीचा 1699 रुपयांचा अनलिमिटेल वार्षिक प्लॅन 2 हजार 399 रुपये इतका होणार आहे. तसेच दररोज 1.5 जीबी डेटासाठी असलेला 199 चा प्लॅन 249 रुपये होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com