मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमचा Address न टाकताच आता घरी पोहोचेल Online Shopping Delivery, अनोख्या प्लानिंगवर सरकारचं काम सुरु

तुमचा Address न टाकताच आता घरी पोहोचेल Online Shopping Delivery, अनोख्या प्लानिंगवर सरकारचं काम सुरु

ऑनलाइन खरेदी
ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, आपण खरेदी का करीत आहात हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे? अनेक लोक जेव्हा दुःखी, उदास असतात तेव्हा खरेदी करत सुटतात. परंतु, आपण आपल्या गरजेनुसार खरेदी करणं केव्हाही चांगलं आहे. तुम्ही खरेदीसाठी किमती खाली येण्याची प्रतिक्षादेखील करू शकता.

ऑनलाइन खरेदी ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, आपण खरेदी का करीत आहात हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे? अनेक लोक जेव्हा दुःखी, उदास असतात तेव्हा खरेदी करत सुटतात. परंतु, आपण आपल्या गरजेनुसार खरेदी करणं केव्हाही चांगलं आहे. तुम्ही खरेदीसाठी किमती खाली येण्याची प्रतिक्षादेखील करू शकता.

DAC ला मान्यता मिळाली, तर ऑनलाइन शॉपिंग आणि प्रॉपर्टी टॅक्स भरण्याच्या कामांमध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकण्याची गरज भासणार नाही.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : भारत सरकारच्या पोस्ट विभागाकडून एका डिजीटल अ‍ॅड्रेस कोड अर्थात DAC वर काम केलं जात आहे. हा कोड देशातील प्रत्येक पत्त्यासाठी दिला जाईल, ज्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणं, eKYC करणं आणि प्रॉपर्टी टॅक्स भरणं सोपं होईल.

पोस्ट ऑफिस विभागाने नुकतंच या डिजीटल अ‍ॅड्रेस कोडचा ड्राफ्ट अप्रोच पेपर आपल्या अधिकृत वेबसाइटवर रिलीज केला आहे. स्टेकहोल्डर्सकडून अप्रोच पेपरवर फीडबॅक आणि सूचना मिळवण्यासाठी अप्रोच पेपर अपलोड करण्यात आला आहे. जर DAC ला मान्यता मिळाली, तर ऑनलाइन शॉपिंग आणि प्रॉपर्टी टॅक्स भरण्याच्या कामांमध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकण्याची गरज भासणार नाही.

या 6 गोष्टी लक्षात ठेवून करा Smart Shopping; फसव्या ऑफर्स, कर्जापासून राहाल दूर

काय आहे डिजीटल अ‍ॅड्रेस कोड -

DAC किंवा डिजीटल अ‍ॅड्रेस कोड एक यूनिक अ‍ॅड्रेस आयडेंटिटी आहे. हा एक आधारसारखाच यूनिक कोड असेल, जो भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या पत्त्यानुसार दिला जाईल. हा कोड टाइप करुन किंवा QR Code प्रमाणे स्कॅन करुन सर्विस प्रोव्हाडर्सच्या Apps वर वापरता येईल. त्यामुळे पत्ता न टाकताच अनेक कामं या कोडच्या मदतीने पूर्ण होतील. हा कोड Digital Maps मध्येही पाहता येईल.

डिजीटल अ‍ॅड्रेस कोड बनवताना यासंबंधीत अधिकारी देशातील प्रत्येक पत्ता अर्थात अ‍ॅड्रेस वेगवेगळा आयडेंटिफाय करुन अ‍ॅड्रेसच्या Geospatial Coordinates शी लिंक करतील, त्यामुळे प्रत्येकाचा अ‍ॅड्रेस एखादा रस्ता किंवा गल्ली नाही तर नंबर्स आणि अक्षरांच्या एका कोडद्वारे ओळखला जाईल. हा कायमस्वरुपी कोड असेल.

या नव्या डिजीटल अ‍ॅड्रेस कोड - DAC मुळे अनेक फायदे होतील. टॅक्स फाइल करणं, ऑनलाइन शॉपिंग, अ‍ॅड्रेस वेरिफिकेशन आणि eKYC सारखी कामं अ‍ॅड्रेस न टाकताच या कोडद्वारे होतील.

First published:

Tags: Online shopping, Post office