हे आहेत देशातील सर्वात स्वस्त फीचर फोन; 709 रुपयापासून किंमती सुरू

हे आहेत देशातील सर्वात स्वस्त फीचर फोन; 709 रुपयापासून किंमती सुरू

या फीचर फोनला मोठा डिस्प्ले आणि इतर फोनप्रमाणे फीचर्स नसल्याने याची बॅटरीही अधिक काळ टिकते. पाहा 1000 रुपयांहून कमी किंमतीतील काही चांगले फीचर फोन...

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी : टेक्नोलॉजीच्या या जगात स्मार्टफोन लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वच जण वापरतात. अतिशय कमी किंमतीत चांगले बजेट फीचर फोनही बाजारात उपलब्ध आहेत. या फीचर फोनला मोठा डिस्प्ले आणि इतर फोनप्रमाणे फीचर्स नसल्याने याची बॅटरीही अधिक काळ टिकते. पाहा 1000 रुपयांहून कमी किंमतीतील काही चांगले फीचर फोन...

Karbonn KX3 -

1000 रुपयाहून कमी किंमतीत हा स्मार्टफोन येतो. या फीचर फोनमध्ये 4MB रॅम आणि 4MB इंटरनल स्टोरेज कॅपेसिटी असून 32 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनला 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ड्युअल सिम सपोर्ट असणाऱ्या या फीचर फोनला 0.3 मेगापिक्सस कॅमेरा देण्यात आला आहे. अधिकतर लोक फीचर फोनचा वापर केवळ कॉलिंगसाठी करतात. या फोनची किंमत 824 रुपये आहे.

(वाचा - WhatsApp ने पहिल्यांदाच ठेवलं स्वत:चं स्टेटस, Privacy Policyबाबत दिलं स्पष्टीकरण)

Lava A1 -

हा फोन ड्युअल सिमसह असून यात 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात कॉलिंग, एसएमएससह, रेडिओ आणि म्युजिक प्लेयरही देण्यात आला आहे. या फोनची किंमत 897 रुपये आहे.

Micromax X378 -

या फोनलाही ड्युअल सिम सपोर्ट आहे. एफएम रेडिओसह 32 MB इंटरनल स्टोरेज आहे. फोनची बॅटरी 800 mAh आहे. या फोनची किंमत 849 रुपये इतकी आहे.

(वाचा - Corona Caller Tune तर ऐकावी लागणारच! आता बिग बींचा नाही, तर हा आवाज असणार)

Intex Eco 105 -

या फोनला 0.3 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच फोनला 1050 mAh बॅटरी देण्यात आली आहे. चांगल्या बॅटरी बॅकअपसह फोनला ड्युअल सिम सपोर्टही आहे. हा फोन 915 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

iKall K3310 -

iKall K3310 फोनला 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला 32 MB रॅम आणि 64 MB इंटरनल स्टोरेज आहे, जो 8 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये वायरलेस एफएम सपोर्टही आहे. या फोनची किंमत 709 रुपये आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 17, 2021, 12:31 PM IST

ताज्या बातम्या