मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

India Mobile Congress 2021: 5G लागू करणं भारताची प्राथमिकता असायला हवी- मुकेश अंबानी

India Mobile Congress 2021: 5G लागू करणं भारताची प्राथमिकता असायला हवी- मुकेश अंबानी

 देशातील सर्वात मोठी टेक इव्हेंट इंडिया मोबाइल काँग्रेस 2021 (India Mobile Congress 2021) ची पाचवी आवृत्ती बुधवारी 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani in India Mobile Congress 2021) यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 डिसेंबर: देशातील सर्वात मोठी टेक इव्हेंट इंडिया मोबाइल काँग्रेस 2021 (India Mobile Congress 2021) ची पाचवी आवृत्ती बुधवारी 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani in India Mobile Congress 2021) यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. मुकेश अंबानी म्हणाले की, भारतात मोबाईल आणि डिजिटल क्षेत्रात (Digital India) मोठा बदल झाला आहे. कोविड नंतर एका गंभीर वळणावर भारत आहे, त्याबाबत ही परिषद होत आहे.

RIL चे CMD मुकेश अंबानी म्हणाले की, एकीकडे भारत आपल्या कोविड-19 (COVID-19 in India) लसीकरण मोहिमेत (COVID-19 Vaccination Drive in India) अभूतपूर्व प्रगती करत आहे. दुसरीकडे यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा उच्च विकासाच्या मार्गावर आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. या दोन मोठ्या कामांच्या यशात आमच्या उद्योगाचे योगदान महत्त्वाचे आहे. मला विश्वास आहे की भारत भविष्यात कोविडच्या कोणत्याही लाटेवर नियंत्रण मिळवण्यात केवळ यशस्वी होणार नाही तर भारताचे आर्थिक पुनरागमन जगाला आश्चर्यचकित करणारे ठरेल.

हे वाचा-आजपासून बाजारात दाखल होतोय आणखी एका कंपनीचा IPO, काय आहे प्राइस बँड

5G बद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की आम्ही 100% स्वदेशी आणि सर्वसमावेशक 5G सोल्यूशन विकसित केले आहे, जे पूर्णपणे क्लाउड नेटिव्ह, डिजिटल व्यवस्थापित आणि भारतीय आहे. आमच्या तंत्रज्ञानामुळे Jio नेटवर्क लवकरात लवकर 4G वरून 5G वर अपग्रेड केले जाऊ शकते.

हे वाचा-शेअर बाजार तेजीत; अवघ्या 15 मिनिटात गुंतवणूकदारांनी कमावले 2.75 लाख कोटी!

2G वरून 4G आणि नंतर 5G पर्यंत लवकरात लवकर पोहोचले जावे

मुकेश अंबानी म्हणाले की, भारताने लवकरात लवकर 2G वरून 4G आणि नंतर 5G कडे गेले पाहिजे. कोट्यवधी भारतीयांना सामाजिक-आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी 2G पर्यंत मर्यादित ठेवणे त्यांना डिजिटल क्रांतीच्या फायद्यांपासून वंचित ठेवत आहे. कोविडमध्ये आपण पाहिलं की जेव्हा सगळं बंद होतं, तेव्हा फक्त इंटरनेट आणि मोबाइलनं आपल्याला जिवंत ठेवलं होतं. तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा आणि रोजगाराचा आधार बनलं आहे.

(डिस्क्लेमर: नेटवर्क18 आणि TV18 कंपन्या चॅनल/वेबसाइटचे संचालन करतात, ज्याचे नियंत्रण इंडिपेंडट मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते,  ज्यात रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)

First published:

Tags: Mukesh ambani