इंटरनेट डेटा वापरात महाराष्ट्र अव्वल! सर्वाधिक खर्च सोशल मीडिया आणि व्हिडिओसाठी

इंटरनेट डेटा वापरात महाराष्ट्र अव्वल! सर्वाधिक खर्च सोशल मीडिया आणि व्हिडिओसाठी

जगात सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा भारतात तर झिम्बॉम्बेमध्ये सर्वात महाग आहे. 28 वर्षांपूर्वी इंटरनेटचा शोध लागला त्यानंतर आतापर्यंत निम्म्याहून अधिक लोक याचा वापर करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : इंटरनेट क्रांतीनं जग जवळ आणलं. आता फोर जी नंतर 5 जी लवकरच येणार आहे. इंटरनेट स्वस्त आणि जास्त स्पीडने मिळाल्यामुळं त्याचा वापर करणाऱ्यांची संख्याही वेगानं वाढली. गेल्या काही वर्षांत तर इंटरनेट डेटा खूपच स्वस्त झाला. आता डेटा दैनंदिन गरज बनल्यासारखं झालं आहे. जगात सर्वात स्वस्त भारतामध्ये इंटरनेट डेटा मिळतो. त्यामुळं इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही देशात सर्वाधिक आहे. यात राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं प्रसिद्ध केलेल्या डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्टनुसार महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक इंटरनेट वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रात 2018 मध्ये 4 कोटी 80 लाख ग्राहक वायरलेस इंटरनेट वापरत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2017 मध्ये हीच संख्या 3 कोटी 50 लाख होती. एका वर्षात 1 कोटी 30 लाख ग्राहक फक्त महाराष्ट्रात वाढले. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशात 4 कोटी 40 लाख ग्राहक आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत 4 कोटी 10 लाख, उत्तर प्रदेशात 4 कोटी, कर्नाटकात 3 कोटी 60 लाख ग्राहक वायरलेस इंटरनेट वापरतात.

मोठ्या शहरांशिवाय ग्रामिण भागातही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक इंटरनेट वापरलं जात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे. तरुण सर्वाधिक सोशल मीडिया आणि व्हिडिओ पाहण्यासाठी डेटा वापरतात असंही ट्रायच्या अहवालात स्पष्ट होत आहे.

सध्या इंटरनेट डेटा ऑफर्सनुसार दिवसाला एक ते दीड जीबीपर्यंत ऑफर असते. ट्रायने म्हटलं आहे की, तरुण वर्ग वगळता दर महिन्याला ग्राहकांकडून सरासरी 9 जीबी इंटरनेट डेटा वापरला जातो. देशातील एकूण ग्राहकांपैकी 87 टक्के ग्राहक फोरजीचा वापर करतात.

डॉट युकेनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात एक जीबी इंटरनेट 18 ते 19 रुपये किंमतीत मिळतं. जगभरात एवढाच डेटा सरासरी 600 रुपयांपर्यंत मिळतो. जगात सर्वात महाग इंटरनेट झिम्बॉम्बेमध्ये असून तिथं 1 जीबी इंटरनेटसाठी 5 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते.

इंटरनेटच्या अविष्काराला 23 ऑगस्टला 28 वर्षे पूर्ण झाली. 1991 मध्ये वर्ल्ड वाइड वेबचा शोध टिम बर्नर्स लीने लावला होता. त्यानंतर झपाट्याने याचा वापर वाढला असून जगभरात 4.42 कोटी युजर आहेत. यापैकी 56 कोटी युजर्स भारतात आहेत. जगातील एकूण लोकसंख्येच्या 57.31 टक्के लोक इंटरनेट वापरतात. सुरुवातीला इंटरनेट आणि अस्ट्रॉनॉट या शब्दांपासून तयार केलेला इंटरनॉट हा शब्द वापरला जात असे. मात्र, कालांतराने इंटरनेट या नावानं ही सेवा ओळखली जाऊ लागली.

नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या