मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

पोरांना लागलं गेमचं वेड: मोबाईलवर गेम खेळण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

पोरांना लागलं गेमचं वेड: मोबाईलवर गेम खेळण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

मोबाईलवर गेम खेळण्यात संपूर्ण देशात आपल्या राज्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. कोरोना (Corona) आणि लॉकडाऊन (Lockdown)च्या काळामध्ये गेम डाऊनलोड्सची संख्या 1 अब्जाने वाढली आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 21 ऑक्टोबर: भारतातील गुजरात आणि महाराष्ट्रातील 7 शहरांमध्ये जास्तीत जास्त मोबाईल गेमर आहेत अशी माहिती ब्रिटनमधील डेटा कंपनी ओपेंसिग्नल यांनी दिली आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मोबाईल नेटवर्कच्या वापराचं 48 शहरात विश्लेषण करण्यात आलं. यात अहमदाबादने100 पैकी 71.7 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. मोबाईल युझर्स आपला वेळ कसा गेम खेळण्यात घालवतात हे कंपनीने स्पष्ट केलं आहे. अहमदाबादनंतर दुसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. 70.1 गुण मिळाले आहेत. बडोदा (69.8), सुरत (68), भोपाळ (67.8), मुंबई (67.8), ग्वाल्हेर (67.7), इंदूर (67.7), ठाणे (65.7), राजकोट (64.3) या शहरांचा नंबर लागतो. इतर मोठ्या शहरांना अनुक्रमे  दिल्ली, बंगळुरू आणि कोलकत्ता 59.8, 61.3 आणि 57.2 असे गुण मिळाले आहेत. तर वाराणसी आणि तिरुवअनंतपुरमसारख्या शहरांमध्ये ही क्रमवारी 50 च्या खाली आहे.

ओपेंसिग्नलच्या म्हणण्यानुसार,परवडणारे स्मार्टफोन, कमी किमतीचा डेटा आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतात मोबाईल गेमिंग वेगाने वाढलं आहे. विशेष म्हणजे यात समान घटकांमुळे ऑनलाईन मोबाईल गेमिंगदेखील मोठ्या शहरांमध्ये स्तर 2 आणि स्तर 3 वर पोहोचली आहे.

गेम खेळण्याचा चांगला अनुभव हा 3 घटकांवर अवलंबून असतो: UDP (युजर डेटा ग्राम प्रोटोकॉल), लेटेन्सी, पॅकेट लॉस आणि जिटर. UDP नेटवर्क कनेक्शनची प्रतिक्रिया दर्शवते याचा अर्थ असा आहे की इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळण्यास उशीर झाला की अ‍ॅक्शन गेममधील खेळाडूंना नीट खेळता येत नाही. विशेषतः PUBG खेळाबाबत इंटरनेट अतिशय महत्वाचा घटक आहे. PUBG आता भारतात बॅन झाला आहे. पॅकेट लॉस हे डेटा पॅकेट्स किती आहेत ते दर्शवते.‌ तसेच जिटर हे डेटा पॅकेटच्या वेळेतील बदल सांगते.

भारतात मोबाईल गेम्स मार्केटची किंमत सध्या अंदाजे 1.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ज्यात या वर्षात वापरकर्त्यांची संख्या अंदाजे 62 कोटींवर पोहोचली आहे. ऑगस्ट सुरुवातीला सेंसर टॉवरने दिलेल्या अहवालात असं दिसून आलं की, मोबाईल गेमवरचा खर्च वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यात 2020 मध्ये ते 27 टक्क्यांनी वाढून तो 19.3 अब्ज डॉलरवर गेला आहे. तशातच covid-19 मुळे गेम डाऊनलोड्ची संख्या भारतात सुमारे 1 अब्जाने वाढली आहे.

First published:

Tags: Mobile, Pubg game