• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता Drone द्वारे घरपोच मिळणार औषधं; 18 जूनपासून सुरू होणार डिलीव्हरी ट्रायल

आता Drone द्वारे घरपोच मिळणार औषधं; 18 जूनपासून सुरू होणार डिलीव्हरी ट्रायल

DGCA कडून 20 मार्च 2020 मध्ये ड्रोन ट्रायलसाठी मंजुरी मिळाली आहे. या ड्रोन मेडिसिन सर्विसची सुरुवात आधीच झाली असती, परंतु कोरोनामुळे याचं ट्रायल थांबवण्यात आलं होतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 जून : तुमच्या घरापर्यंत आता औषधांची डिलीव्हरी Drone ने होईल. याला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे. याचं ट्रायल 18 जूनपासून बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. ज्या ड्रोनला यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, त्यांना Beyond The Visual Line of Sight (BVLOS) म्हटलं जातं. जिथे या ड्रोनचा प्रयोग होणार आहे, ते बेंगळुरूपासून सुमारे 80 किलोमीटरवर आहे. ज्या कंपन्या ही सर्विस देणार त्यात बेंगळुरूची थ्रोटल एयरोस्पेस सिस्टम (TAS) सामिल आहे, ज्याला DGCA कडून 20 मार्च 2020 मध्ये मंजुरी मिळाली आहे. या ड्रोन मेडिसिन सर्विसची सुरुवात आधीच झाली असती, परंतु कोरोनामुळे याचं ट्रायल थांबवण्यात आलं होतं. TAS ला मंजुरी मिळाली असून हे ट्रायल 18 जूनपासून सुरू होणार असून 30-45 दिवसांपर्यंत चालेल. या ड्रोन ट्रायलसोबत इतरही काही संघ सामिल असणार आहेत. TAS शिवाय Narayana Health देखील यात पार्टनर आहे, जे ट्रायलदरम्यान औषधं उपलब्ध करुन देणार आहेत. तसंच इनवोली-स्विस जे प्रोफेशनल ड्रोन अॅप्लिकेशनसाठी एअर ट्रॅफिक अवेयरनेस सिस्टम स्पेशलिस्ट आहेत, तेदेखील यात सामिल असणार आहे. हनीवेल एयरोस्पेस एक सेफ्टी एक्सपर्ट म्हणून यात काम पाहणार आहे.

  (वाचा - देशातील दुर्गम भागात ड्रोनने पोहोचवण्यात येणार कोरोना लस,असा आहे सरकारचा प्लॅन)

  या ट्रायलमध्ये दोन प्रकारच्या ड्रोनचा वापर होणार आहे. यात MedCOPTER आणि TAS सामिल आहे. TAS चे सीईओ नागेंद्रन कंडासामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, MedCOPTER चं छोटं वेरिएंट एक किलोग्रॅम वजन 15 किमीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. तर दुसरं 2 किलो वजन 12 किमीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. या दोघांची टेस्टिंग 30-45 दिवसांपर्यंत होणार असून DGCA च्या आदेशानुसार 100 किलोमीटरपर्यंत उड्डाण करेल. ट्रायल झाल्यानंतर याच्या रिव्ह्यूसाठी ते अथॉरिटिजकडे सोपवलं जाईल.
  Published by:Karishma Bhurke
  First published: