मोबाईल बँकिंगचा वापर करत असल्यास सावधान; देशात सायबर फ्रॉडच्या संख्येत वाढ

मोबाईल बँकिंगचा वापर करत असल्यास सावधान; देशात सायबर फ्रॉडच्या संख्येत वाढ

जर तुम्ही स्मार्ट फोन, नेट बँकिंग, डिजिटल बँकिंगचा वापर करत असाल तर सावध व्हा. नुकत्याच आलेल्या NCRB च्या रिपोर्टनुसार, भारतात 2019 मध्ये सायबर फ्रॉडच्या संख्येत 64 टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : जर तुम्ही स्मार्ट फोन, नेट बँकिंग, डिजिटल बँकिंगचा वापर करत असाल तर सावध व्हा. नुकत्याच आलेल्या NCRB च्या (National Crime Record Bureau) रिपोर्टनुसार, भारतात 2019 मध्ये सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) संख्येत 64 टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 2019 मध्ये सायबर फ्रॉडची 44,546 प्रकरणं समोर आली होती. तर 2018 मध्ये 28,248 केसेसची नोंद झाली होती.

या राज्यात सर्वाधिक सायबर फ्रॉडच्या केसेस

कर्नाटकात सर्वाधिक 12,020 सायबर गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशात 11,416, महाराष्ट्रात 4967, तेलंगाणा 2691 आणि आसाममध्ये 2231 सायबर फ्रॉडची प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. सर्वाधित फ्रॉड कंम्युटरच्या माध्यमातून होत असल्याचं समोर आलं आहे. या रिपोर्टनुसार, 5.1 टक्के प्रकरणं लैंगिक हिंसेसंबंधी आहेत.

विना इंटरनेट असं वापरा गूगल मॅप; ऑफलाईन GPS वापरण्याची सोपी ट्रिक

आकडेवारीनुसार, महानगरांमध्ये एकूण 18,372 प्रकरणांची नोंद झाली असून त्यात 81.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. अधिकतर 13,814 प्रकरणं कंम्युटरसंबंधी (आयटी कायद्याच्या कलम 66) गुन्ह्यांअंतर्गत दाखल करण्यात आली आहेत.

कोट्यवधी इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी, ऍपल, मायक्रोसॉफ्टकडून धोक्याचा इशारा

Published by: Karishma Bhurke
First published: October 2, 2020, 4:40 PM IST

ताज्या बातम्या