काही मिनिटांत मिळणार PAN कार्ड, प्राप्तिकर विभागाची नवी सेवा

काही मिनिटांत मिळणार PAN कार्ड, प्राप्तिकर विभागाची नवी सेवा

प्राप्तिकर विभाग आता नवीन सेवा सुरू करणार असून आता पॅन कार्ड काही मिनिटात मिळणार आहे. यासाठी कोणती कागदपत्रेही द्यावी लागणार नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : प्राप्तिकर विभागाकडून लवकरच काही मिनिटांत पॅनकार्ड तयार करण्याची सुविधा लॉन्च करणार आहे. यामध्ये आधार कार्डच्या माध्यामातून अर्ज करणाऱ्याची माहिती घेतली जाईल. त्या माहितीमुळे पॅन कार्डच्या माहितीची पडताळणी करणं सोपं जाईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ही सुविधा पुढच्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च होईल. यामध्ये पॅन कार्ड हरवलेल्या लोकांनाही पॅन कार्ड मिळेल. काही मिनिटांमध्ये डुप्लिकेट पॅनकार्ड तयार होईल.

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक पॅन सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. ePAN तयार करण्यासाठी आधार कार्डच्या माहितीवरून व्हेरिफिकेशन करण्यात येईल. यासाठी तुमच्याकडे एक OTP येईल. आधार मध्ये असलेल्या नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती ऑनलाइन अॅक्सेस केली जाईल. यासाठी PAN card तयार करण्यासाठी ठराविक माहिती वगळता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल.

PAN जनरेट झाल्यानंतर अर्जदाराला एक डिजिटल सही असलेलं ePAN दिलं जाईल. यामध्ये एक QR कोड असेल. फसवणूक, डिजिटल फोटोशॉपिंग हे रोखण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती इनक्रिप्ट केली जाईल.

वाचा : कर्मचाऱ्यांना आठवड्यात तीन दिवस सुट्टी दिल्याचा कंपनीला झाला 'हा' फायदा!

नव्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आठ दिवसांत 62 हजारांहून अधिक ePAN जारी करण्यात आली आहेत. आता देशभरात हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल. प्राप्तिकराच्या सेवा डिजिटल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असून कुठेही न जाता पॅन कार्ड तयार करून मिळेल.

वाचा : धोकादायक 32 पासवर्ड!, तुम्हीही ठेवला असेल तर लगेच बदला

वाचा : जिओच्या स्वस्त ऑफर विसरून जाल, कॉल केल्यावर पैसे देणार 'ही' कंपनी

गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pan card
First Published: Nov 5, 2019 01:50 PM IST

ताज्या बातम्या