एलजीच्या क्यू सीरिजमधला एलजी क्यू 6 लॉन्च

एलजीच्या क्यू सीरिजमधला एलजी क्यू 6 लॉन्च

एलजीनं LG Q6+ आणि LG Q6a लॉन्च केले होते, एलजी क्यू6चं डिझाईन एलजी जी6 सारखंच आहे.

  • Share this:

स्नेहल पाटकर, 11 आॅगस्ट : दक्षिण कोरियाई इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजीनं भारतात आपला क्यू सिरीजमधला एलजी क्यू6 स्मार्टफोन लॉन्च केलाय. याआधीच एलजीनं LG Q6 आणि LG Q6a लॉन्च केले होते, एलजी क्यू6चं   डिझाईन एलजी जी6 सारखंच आहे.

काय आहेत या फोनचे फिचर्स?

-या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं  फुलव्हिजन डिस्प्ले दिलाय.

-ड्युअल सीमकार्ड स्लॉट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1.1 नोगट वर चालतो.

-5.5 इंचाचा फुलव्हिजन डिस्प्ले यात दिला गेलाय.

-या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर असेल.

-तर 13 मेगापिक्सल का रिअर कॅमेरा आणि वाईड-अॅगल लेंसच्या सोबत 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा यात आहे.

-3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज यात असेल.

-कनेक्टिविटीसाठी यामध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, एनएफसी आणि यूएसबी टाइप-बी 2.0 सारखे फिचर्स आहेत.

-आणि 149 ग्रॅम वजन असणाऱ्या या फोनची  बॅटरी 3000 mAh ची आहे

-एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर याचाही समावेश या स्मार्टफोनमध्ये आहे.

-LG Q6 ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर 14 हजार 990 रुपयांत उपलब्ध आहे.

First published: August 11, 2017, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading