• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • दर 10 मिनिटाला चोरी होतेय एक बाईक; चोरट्यांपासून तुमची गाडी कशी सुरक्षित ठेवाल पाहा

दर 10 मिनिटाला चोरी होतेय एक बाईक; चोरट्यांपासून तुमची गाडी कशी सुरक्षित ठेवाल पाहा

जगभरात फ्रान्स एकमेव असा देश आहे, जिथे दर 10 मिनिटाला एक टू-व्हिलर (Two Wheeler) चोरी होते. शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 मे : जगभरात फ्रान्स एकमेव असा देश आहे, जिथे दर 10 मिनिटाला एक टू-व्हिलर (Two Wheeler) चोरी होते. शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे. एका अभ्यासानुसार, आपल्या वाहनाप्रती अलर्ट न राहणं, हे यामागे सर्वात मोठं कारणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतातही दरवर्षी टू-व्हिलर चोरी होण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यापैकी काहीच प्रमाणात बाईक पोलिसांकडून मिळवल्या जातात. त्यामुळे बाईक चोरी होण्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स फायद्याच्या ठरू शकतील. टू-व्हिलर पार्किंग - टू-व्हिलरची अधिकतर चोरी, चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यामुळे होते. ज्यावेळी एखादा व्यक्ती रस्त्याच्या कडेला बाईक पार्क करुन खरेदीसाठी किंवा ऑफिसमध्ये जातो, त्यावेळी अनेक तासांपर्यंत वाहन बेवारस होतं. अशात चोरांना रस्त्याच्या कडेला लावलेली बाईक चोरण्याची पूर्ण संधीच मिळते. त्यामुळे कधीही बाईक पार्क करताना, एखाद्या ओळखीच्या व्यक्तीजवळ किंवा पेड पार्किंगमध्येच लावावी.

  (वाचा - कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई)

  लॉक - अनेकदा घाई-गडबडीत टू-व्हिलरचं लॉक लावणं विसरलं जातं, किंवा काही मिनिटांचं काम आहे, लगेच येऊ, असा विचार करुन अनेक जण बाईक लॉक करायचं टाळतात. याचं निष्काळजीपणाचा फायदा चोरट्यांकडून घेतला जातो आणि बाईक चोरी केली जाते. एखाद्या मिनिटाच काम असेल, तरी टू-व्हिलर लॉक करणं फायद्याचं ठरतं.

  (वाचा - आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!)

  GPS - बाजारात स्वस्त आणि चांगले जीपीएस (GPS) उपलब्ध आहेत. जर वाहन चोरी झालं, तर जीपीएसच्या मदतीने वाहनाच्या लोकेशनवर पोहचता येऊ शकतं. तसंच वाहनाला लावलेल्या जीपीएसला आपल्या स्मार्टफोन किंवा कम्प्यूटरने ट्रॅक करता येऊ शकतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: