मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /हॅकर्सकडून बचाव करण्यासाठी AI देणार सायबर सिक्युरिटी, वाचा काय आहे हे नवीन तंत्रज्ञान

हॅकर्सकडून बचाव करण्यासाठी AI देणार सायबर सिक्युरिटी, वाचा काय आहे हे नवीन तंत्रज्ञान

2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मानवाची जागा घेईल, असा विश्वास 41 टक्के आयटी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मानवाची जागा घेईल, असा विश्वास 41 टक्के आयटी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मानवाची जागा घेईल, असा विश्वास 41 टक्के आयटी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली, 18 जानेवारी : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची व्याप्ती (Artificial Intelligence) सर्वच क्षेत्रात वाढली आहे. सायबर सुरक्षा (Cyber Security) क्षेत्रात हॅकर्स (Hackers) अधिक अत्याधुनिक साधने वापरत असल्यानं 2031 पर्यंत हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सायबर सुरक्षा क्षेत्रात मानवाची (Humans) जागा घेईल, असा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.

सर्वत्र व्यापक झाल्यामुळे, ‘ट्रेंड मायक्रो’ या क्लाऊड सिक्युरिटी फर्मनं नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, 2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मानवाची जागा घेईल, असा विश्वास 41 टक्के आयटी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

केवळ 9 टक्के लोकांनी, पुढील दहा वर्षे तरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान त्यांची जागा घेऊ शकणार नाही, त्यामुळं त्यांची नोकरी बदलणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर 32 टक्के लोकांनी सर्व सायबर सुरक्षा क्षेत्र स्वयंचलित करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान करेल, असं मत व्यक्त केलं आहे. 19 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, 2025 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सायबर सुरक्षा क्षेत्रात सहज सामान्य होईल.

2020 मधील हादरवणाऱ्या घटनांनी जगभरातील कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल घडवून आणले आहेत. तसंच सायबर गुन्हेगारांसाठी नव्या संधी, मार्ग उपलब्ध झाले आहेत. 2021 मध्ये उद्योजक, सरकारी यंत्रणा आणि सामान्य युजर्सना या नवीन परिस्थितीशी सुरक्षितपणे जुळवून घेण्यासाठी सायबर सुरक्षा मदत करेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

(वाचा - WhatsApp Web ही सेफ नाही? गुगल सर्चवर युजर्सचे पर्सनल मोबाईल नंबर लीक)

सर्वेक्षण केलेल्यांपैकी पाचपैकी एकानं, 2025 पर्यंत सायबर गुन्हेगार आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करतील, असं मत व्यक्त केलं आहे. एक चतुर्थांश आयटी तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, 2030 पर्यंत माहिती संबधित परवानग्या बायोमेट्रिक किंवा डीएनए डेटाशी जोडल्या जातील, ज्यामुळे अनधिकृत प्रवेश मिळवणं अशक्य होईल.

या वर्षापुरता विचार केल्यास 2021 मध्ये टेलिकम्युटिंग (Telecommuting) सुरू राहील आणि ऑफिसचं काम आणि वैयक्तिक कामं एकाच यंत्रांवर करण्याचं हायब्रिड वातावरण (Hybrid Environment) कायम राहील, ज्यामुळं सुरक्षितता राखणं आव्हानात्मक असेल. कंपन्या विशेषत: जागतिक उद्योगांचं त्यांच्या डेटावरील (Data) नियंत्रण कमी होईल. डेटा कुठं संग्रहित केला आहे आणि त्यावर कशी प्रक्रिया केली आहे, त्याचा माग ठेवणं कठीण होईल. कर्मचारी वैयक्तिक अॅप्स ऑफिसच्या उपकरणांद्वारे वापरतील, तेव्हा अधिक अडचणी निर्माण होतील, असं ‘टर्निंग द टाइड’ (Turning The Tide) नावाच्या अहवालात म्हटलं आहे.

(वाचा - सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी)

2021 मध्ये युजर्स आणि उद्योग यांनी घरातून काम करण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेतील धोके कमी केले पाहिजेत. आयटी कर्मचाऱ्यांनी रिमोट वर्कफोर्सेस (Remote Workforces) सुरक्षित ठेवले पाहिजेत, तर वैयक्तिक युजर्सना त्यांची व्हर्च्युअल वर्कस्पेस (Virtual Workspace) आणि मुख्य साधनं (Endpoint Devices)सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे.

‘कोविड 19’(Covid 19) संबंधित स्पॅम ईमेल्सची (Spam Emails) संख्या आणि फिशिंगचे (Phishing) प्रयत्न वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आपलं नवीन सावज पकडण्यासाठी कोरोना विषाणूचा आणि या साथीशी संबधित घडामोडींचा वापर करतील, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

First published:

Tags: Cyber crime