Corona काळात मदतीच्या नावाखाली होतेय फसवणूक; इथे करा तक्रार

Corona काळात मदतीच्या नावाखाली होतेय फसवणूक; इथे करा तक्रार

कोरोना केसेस वाढल्यानंतरच कोरोनासंबंधी औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, वॅक्सिनेशनसंबंधी फ्रॉड सतत उघड होत आहेत. अशात जर एखाद्यासोबत फ्रॉड झालाच, तर या कोरोनासंबंधी फ्रॉडबाबत तक्रार करता येऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मे : देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतोच आहे. क्रिकेटर, सेलिब्रिटीज, अनेक संस्था, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांसह सर्वसामान्यही कोरोनाच्या या कठीण काळात मदतीसाठी पुढे सरसारवले आहेत. तर अशात काही लोक मात्र कठीण परिस्थितीचा गैरवापर करत आहेत. फ्रॉड करणारे या परिस्थितीचा गैरफायदा घेत गरजूंकडून पैसे उकळण्याचं काम करत आहेत.

कोरोना केसेस वाढल्यानंतरच कोरोनासंबंधी औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, वॅक्सिनेशनसंबंधी फ्रॉड सतत उघड होत आहेत. अशात जर एखाद्यासोबत फ्रॉड झालाच, तर या कोरोनासंबंधी फ्रॉडबाबत तक्रार करता येऊ शकते.

अशाप्रकारे झाले फ्रॉड -

फ्रॉड करणारे लोक गरजूंना ऑक्सिजन सप्लाय, हॉस्पिटल बेड्स, रेमडेसिविरच्या नावाने आपल्या जाळ्यात अडकवतात. मदतीच्या आशेने गरजू अशा फ्रॉड लोकांना पेमेंट करतात. परंतु एकदा पेमेंट झाल्यानंतर त्यांना कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाही. फ्रॉड करणारे सोशल मीडिया साईट्स ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकची मदत घेत आहेत. कारण अनेक जण कोणत्याही मदतीसाठी थेट सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करुन ऑक्सिजन, बेड्स किंवा कोरोनासंबंधी कोणतीही माहिती विचारतात.

(वाचा - Lockdown काळात बाहेर जाण्याची गरज नाही; घरबसल्या बनवा Driving License)

सध्या सोशल मीडियावर चुकीची आणि फेक माहितीही व्हायरल होते आहे. याचाच फायदा फ्रॉड करणाऱ्यांकडून घेतला जातो. फ्रॉड करणारे गरजूंना व्हॉट्सअ‍ॅप पे, गुगल पे आणि पेटीएमद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगतात. पण जसे पैसे मिळतात, तसं लगेच त्या युजरला ब्लॉक केलं जातं.

(वाचा - COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका)

कोरोनासंबंधी कोणताही फ्रॉड झाल्यास येथे करा तक्रार -

- हे फ्रॉड रोखण्यासाठी दिल्ली पोलीस अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी एक सर्विस सुरू केली आहे. याची माहिती दिल्ली पोलिसांनीच ट्विटरवर दिली आहे.

- अशा घटना घडल्यास लोक आता ऑनलाईन रिपोर्ट करू शकतात. त्यासाठी 01123469900 या क्रमांकावर कॉल करुन मदत घेतली जाऊ शकते.

- जर ऑनलाईन पेमेंट केलं असेल, तर त्यासाठी #155260 वर रिपोर्ट करता येईल.

- त्याशिवाय http://cybercrime.gov.in वरही रिपोर्ट करू शकता.

Published by: Karishma Bhurke
First published: May 6, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या