2021मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या होणार 82.9 कोटी

2021मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या होणार 82.9 कोटी

काय करत होतीस? असं विचारलं असता आपण सहज म्हणतो काही नाही इंटरनेटवर टाइमपास. पण याच इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची संख्या 45 कोटींपेक्षाही जास्त वाढली आहे.

  • Share this:

06 नोव्हेंबर : काय करत होतीस? असं विचारलं असता आपण सहज म्हणतो काही नाही इंटरनेटवर टाइमपास. पण याच इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची संख्या 45 कोटींपेक्षाही जास्त वाढली आहे.1969 मध्ये इंटरनेटचा शुभारंभ झाल्याच्या 26 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1995 रोजी भारतात इंटरनेट सुरू झालं. विदेशी कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने त्यांच्या भारतीय दूरध्वनी यंत्राद्वारे जगातील संगणकांना भारतीय संगणकांशी जोडून इंटरनेटची सुरुवात केली.

इंटरनेट सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी, 1998मध्ये खाजगी कंपन्यांनी इंटरनेट सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि कदाचित त्याचमुळे सध्या भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या 45 कोटींपेक्षा जास्त आहे.भारत पुढील तीन वर्षांत डिजिटायझेशन आणि इंटरनेट ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे.म्हणजे 2021मध्ये ही संख्या 82.9 कोटी होईल असा अंदाज नाकारता येत नाही.

48 वर्षांपूर्वी अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ डिफेंसच्या अॅडव्हान्स डिफेन्स प्रोजेक्टस् एजन्सीने नेटवर्किंगद्वारे चार युनिवर्सिटीच्या संगणकांना कनेक्ट करून 'इंटरनेट'चं विश्व सुरू केलं. तेव्हा त्याला अप्रानेट (APRANET) असं म्हणायचे. अमेरिकेत समृद्धी आणि शिक्षणाचा प्रसार हे अप्रानेटचं उद्दिष्ट होतं. पण वाढतं सायबर क्राईम पाहता भारतात इंटरनेटचा वापर वाढण्याचं काय उद्दिष्ट आहे हे सांगणं कठीणच आहे.

First published: November 6, 2017, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading