Home /News /technology /

लँडलाइनवरून मोबाईलवर फोन करण्याआधी वाचा हा महत्त्वाचा नियम

लँडलाइनवरून मोबाईलवर फोन करण्याआधी वाचा हा महत्त्वाचा नियम

लँडलाइन फोनवरून डायल करताना मोबाईल क्रमांकापूर्वी 0 लावावा लागणार 15 जानेवारीपासून सुरुवात

    मुंबई, 26 नोव्हेंबर : लँडलाईनवरून मोबाईल क्रमांकावर फोन लावण्यासाठी यापुढे नवीन नियम करण्यात आले आहेत. यापुढे लँडलाईनवरून फोन करण्यासाठी मोबाइल क्रमांकाच्या आधी '0' डायल करावा लागणार आहे. संपर्क मंत्रालयाने या संदर्भात माहिती देताना भविष्यात आणखी क्रमांक तयार होण्यासाठी यामुळे मदत होणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर 2,539 मिलियन इतक्या क्रमांकाच्या सिरीज देखील तयार होतील. फिक्स ते फिक्स, मोबाइल-ते-फिक्स आणि मोबाईल-ते-मोबाइल कॉलसाठी नंबर डायल करण्याच्या संदर्भात कोणताही बदल होणार नाही असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 15 जानेवारी 2021 पासून लँडलाइनवरून सर्व मोबाईल क्रमांकावर फोन करण्यासाठी मोबाइल नंबरच्या आधी '0' लावावा लागणार आहे. यासाठी एक नवीन ऑडिओ तयार केला जाणार असून ज्यावेळी एखादी व्यक्ती फोनवर संपर्क साधेल त्यावेळी त्याला तो ऐकू जाईल. सर्व लँडलाइन ग्राहकांना '0' डायलिंग सुविधा प्रदान केली जाईल. "ही नवी क्रमांकाची पद्धत सुरू झाल्यामुळे नवी नंबर प्रणाली मोकळी होईल ज्याचा भविष्यात अधिक कनेक्शन जोडण्यासाठी व ग्राहकांनाच उपयोग होणार असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. ग्राहकांना कमीतकमी गैरसोय व्हावी आणि आवश्यक क्रमांक तयार करण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा निर्णय लागू करत असल्याचं मंत्रालयाने म्हटले आहे. हे वाचा-भारताची 4 महिन्यांत पाचव्यांदा अ‍ॅपबंदी; 43 Chinese Apps ला भारतीय पर्याय? टेलिकॉम विभागाने नुकतेच 1 जानेवारीपर्यंत टेलिकॉम कंपन्यांना नवीन यंत्रणा लागू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम सेवेसाठी पुरेशी क्रमांक तयार करण्यासाठी क्षेत्रीय नियामक ट्रायने केलेल्या शिफारसी मान्य केल्या आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने यावर्षी मेमध्ये लँडलाइन नंबरवरून मोबाइल क्रमांकावर कॉल करण्यासाठी मोबाईल क्रमांकाआधी '0' डायल करण्याची शिफारस केली होती. हे वाचा-Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर; महिन्याच्या बिलासाठी EMIचा पर्याय यामध्ये '0' लावल्याने मोबाईल क्रमांकातील आकडे वाढणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी त्याचा विचार करणे गरजेचे नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी देखील मोबाईल क्रमांक 11 आकडी करण्याचा निर्णय सरकार करत होते. परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लँडलाइन वापरणाऱ्यांचं प्रमाण मोबाइल वापरणाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे हा बद्ल स्वीकारला जाईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Techonology

    पुढील बातम्या