मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

IMC 2020 : 'टेलिकॉम हब' होणार भारत, लवकरच 5G सुरू - पंतप्रधानांची घोषणा

IMC 2020 : 'टेलिकॉम हब' होणार भारत, लवकरच 5G सुरू - पंतप्रधानांची घोषणा

इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2020) या कार्यक्रमाचा आज उदघाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास  पंतप्रधान नरेंद्र मोदींची  प्रमुख उपस्थिती असून त्यांनी जनतेला  व्हर्च्युअली संबोधित केले.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 08 डिसेंबर : भारत जगातल्या टेलिकॉम उद्योगाच्या अग्रस्थानी असेल. टेलिकॉम हब म्हणून देशाचं नाव होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm narendra modi) हस्ते  IMC 2020 चं उदघाटन झालं. IMC 2020 हा कार्यक्रम  8 ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान  होणार असून कोरोनाच्या संकटामुळे व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला आहे. मोदी आपल्या भाषणात म्हणाले, 'भारतात लवकरच  5G टेक्नॉलॉजी (5G Technology) सुरू केली जाईल. या व्यतिरिक्त, डिजिटल मिशन (Digital Mission) अंतर्गत भारतातील प्रत्येक गाव आणि शहर डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.तसेच  उत्तम आरोग्यसेवा, चांगले शिक्षण, शेतकर्‍यांना योग्य माहिती आणि संधी, छोट्या व्यवसायांसाठी चांगल्या बाजारपेठेत प्रवेश ही काही उद्दिष्टे सरकारपुढे आहेत ज्यासाठी आपण आगामी तंत्रज्ञान क्रांतीच्या बळावर एकत्र काम करू शकू. IMC 2020 मध्ये  मोदींनी 'या' गोष्टींवर भर दिला 1)डिजिटल व्यवस्थेमुळे गावं आणि शहरं एकत्रीकरण 2)डिजिटल व्यवस्थेमुळे देशात ऐतिहासिक बदल झाला 3)भारतीय IT सर्व्हिस इंडस्ट्री नवीन स्तरावर पोचवण्याचे प्रयत्न करण्यात आले 4)टेक्नॉलॉजीच्या मदतीने राहणीमान सुधारण्यावर भर घालण्यात आला 5)आयटी, टेक क्षेत्रातील क्षमता वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले 6)प्रत्येक गावात  हायस्पीड फायबर कनेक्टिव्हिटीवर भर घालण्यात आला 7) इलेक्ट्रॉनिक वेस्टसाठी टास्क फोर्स तयार करणार 8)भारत टेलिकॉम उपकरणे बनवण्याचे केंद्र बनू शकते 9) 5Gलवकरच  आणण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक भारत लवकरच 5G  टेक्नॉलॉजी पंतप्रधान म्हणाले, भारत लवकरच टेलिकॉम उपकरणे, विकास व उत्पादन व डिझाईन सेंटर बनवण्याचे काम करेल.याचबरोबर  कोट्यवधी भारतीयांना सक्षम करण्यासाठी 5G तंत्रज्ञान वेळेवर आणले जाईल. साथीत टेक्नॉलॉजीने ठरली वरदान कोरोनाच्या या संकट काळाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले कोरोना काळात एकमेकांनपासून लांब राहून देखील नागरिक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि टेक्नॉंलॉजीच्या  मदतीने एकमेकांशी जोडलेले होते. यामध्ये विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू शकतो तर डॉक्टर देखील लॅब मध्ये  राहून आपल्या रुग्णाला तपासू शकतात,असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.
First published:

Tags: Narendra modi, PM narendra modi

पुढील बातम्या