मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोरोना लशीसाठी CoWin वर नोंदणीसाठी अडचण येतेय? तुमच्यासाठी मदतशीर ठरेल हे नवं App

कोरोना लशीसाठी CoWin वर नोंदणीसाठी अडचण येतेय? तुमच्यासाठी मदतशीर ठरेल हे नवं App

1 मे रोजी हे अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आलं. 6 मेपर्यंत, 10 हजारांहून अधिक व्यक्तींनी त्यावर नोंदणी केली.

1 मे रोजी हे अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आलं. 6 मेपर्यंत, 10 हजारांहून अधिक व्यक्तींनी त्यावर नोंदणी केली.

1 मे रोजी हे अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आलं. 6 मेपर्यंत, 10 हजारांहून अधिक व्यक्तींनी त्यावर नोंदणी केली.

    नवी दिल्ली, 18 मे : कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळवणं हे एक दिव्यच झालं आहे. कारण बुकिंगसाठी स्लॉट्स ओपन झाल्याचं कळलं, की अवघ्या काही मिनिटांत ते फुल होऊन जात आहेत. अनेकदा तर स्लॉट्स ओपन झाल्याचंही कळत नाही. त्यामुळे फारच थोड्या व्यक्तींना अपॉइंटमेंट मिळते. या पार्श्वभूमीवर, IIM आणि NIT या नामवंत संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन लोकॅलिटी (localiti.io) नावाचं एक अ‍ॅप्लिकेशन (Application) विकसित केलं आहे.

    लोकांना लसीकरणासाठी स्लॉट बुक (Vaccination Slot Booking) करायला हे अ‍ॅप्लिकेशन मदतशीर ठरणार आहे. 18 ते 44 वयोगटातल्या, लसीकरणाची वाट पाहणाऱ्या व्यक्तींना उपलब्ध स्लॉट्सची माहिती देणारे अ‍ॅलर्टस् आणि नोटिफिकेशन्सही (Alerts & Notification) या अ‍ॅपद्वारे पाठवली जाणार आहेत.

    कुरुक्षेत्र येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा (NIT) माजी विद्यार्थी पर्तिक मदान, रोहतक येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) या संस्थेचा आणि NIT चा माजी विद्यार्थी प्रतिक सिंग, तसंच इक्सिगो (Ixigo) कंपनीचा माजी कर्मचारी भारत भूषण या तिघांनी हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) ट्विट करून या तिघांचं कौतुक केलं आहे. 1 मे रोजी हे अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आलं. 6 मेपर्यंत, 10 हजारांहून अधिक व्यक्तींनी त्यावर नोंदणी केली. 'दी ट्रिब्यून'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    (वाचा - घाईगडबडीत हे 5 बनावट CoWin वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करू नका, सरकारचा इशारा)

    लोकॅलिटी हे अ‍ॅप नेबरहूड बेस्ड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर (Neibourhood Based Communication Platform) आधारित असून, नव्या स्लॉट्सच्या उपलब्धतेसाठी वारंवार रिफ्रेश करून पाहण्याचा त्रास या अ‍ॅपच्या वापरामुळे थांबतो.

    या अ‍ॅपसाठीचा डेटाको-विन API पोर्टलवरून रिअर-टाइम स्वरूपात सोर्स केला जातो. त्यामुळे हे अ‍ॅप वापरण्यासाठी लोकांना आधी को-विन अ‍ॅपवर नोंदणी करणं गरजेचं आहे.

    हे अ‍ॅप विकसित करणारा प्रतिक सिंग म्हणाला, 'लोकांना आपल्या भागातल्या लसीकरणाच्या स्लॉट्सची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आम्ही हे अ‍ॅप विकसित केलं. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरच्या व्यक्तींच्या लसीकरणाची सुरुवात होणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आम्ही हे अ‍ॅप विकसित केलं.'

    भारताच्या कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात वेगवेगळी विद्यापीठं आणि संस्थांमधल्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानाच्या साहाय्याने नवी उपकरणं, पोर्टल्स विकसित करून नागरिकांना खात्रीशीर वैद्यकीय माहिती पुरवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus