नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : एखादा लहान व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 10 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन WhatsApp द्वारे त्वरित मिळू शकेल. नॉन बँकिंग फायनेंशियल कंपनी (NBFC) IIFL फायनान्सने WhatsApp वर इन्स्टंट बिजनेस लोनची सुविधा लाँच केली आहे. युजर्स कमीत-कमी डॉक्युमेंट्सद्वारे 10 लाख रुपयांपर्यंतचं लोन घेऊ शकतात. या लोनसाठी केवळ 5 मिनिटांत अप्रुवल मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे.
24 तास कधीही करता येणार अप्लाय -
IIFL फायनान्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात WhatsApp युजर्ससाठी ही अतिशय सोपी लोन सुविधा आहे. याच्या मदतीने 10 मिनिटांत लोन मिळवता येईल. AI-bot च्या मदतीने युजर्सचे इनपुट, लोन ऑफरशी मॅच केले जातील. त्यानंतर KYC, बँक अकाउंट वेरिफिकेशननंतर अॅप्लिकेशन करता येईल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp द्वारे IIFL फायनान्सकडून कर्ज मिळवण्यासाठी युजरला 9019702184 नंबरवर “Hi” लिहून पाठवावं लागेल. त्यानंतर बेसिक माहिती द्यावी लागेल. त्याचे KYC पूर्ण करावे लागतील आणि बँक ट्रान्सफर डिटेल्स वेरिफाय करावे लागतील. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागेल आणि त्वरित अकाउंटमध्ये फंड मिळवता येईल.
IIFL फायनान्सचे चीफ रिस्क ऑफिसर संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं, की लहान व्यावसायिक WhatsApp चॅटवरुन संपूर्ण औपचारिकता पूर्ण करुन फंड मिळवू शकतात. WhatsApp वर चॅट सोपं, सुरक्षित आणि एंड-टू-एंड सिक्योर आहे.
IIFL फायनान्स लिमिटेड कंपनी एक रिटेल सेक्टरमध्ये काम करणारी देशातील प्रमुख नॉन बँकिंग फायनेंशियल कंपनी आहे. ही कंपनी व्यावसायिक कर्जाशिवाय आपली सहाय्यक कंपनी IIFL होम फायनान्स आणि समस्ता मायक्रो फायनान्स लिमिटेडद्वारे तारण कर्जही देते. या कंपनीच्या लोन पोर्टफोलियोमध्ये होम लोन, गोल्ड लोन, बिजनेस लोन, मायक्रो फायनान्स, कॅपिटल मार्केट फायनान्स आणि डेव्हलपर अँड कन्स्ट्रक्शन फायनान्स प्रोडक्ट सामिल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, Whatsapp News, WhatsApp user