Home /News /technology /

तुमच्या मुलांचा 5 वा बर्थडे सेलिब्रेट केलात; आता त्यांचं Aadhaar Card अपडेट करा नाहीतर...

तुमच्या मुलांचा 5 वा बर्थडे सेलिब्रेट केलात; आता त्यांचं Aadhaar Card अपडेट करा नाहीतर...

जर तुम्ही तुमच्या मुलाचं आधार कार्ड बनवलं असेल, तर ते 5 व्या आणि 15 व्या वर्षी अपडेट करावं लागेल. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. UIDAI ने याबाबत माहिती दिली आहे.

  नवी दिल्ली, 9 एप्रिल : आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था UIDAI ने नवजात बाळाचंही आधार कार्ड बनवलं जाऊ शकत असल्याचं सांगितलं आहे. परंतु हे आधार कार्ड दोन वेळा अपडेट करावं लागेल. जर तुम्ही तुमच्या मुलाचं आधार कार्ड बनवलं असेल, तर ते 5 व्या आणि 15 व्या वर्षी अपडेट करावं लागेल. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. UIDAI ने याबाबत माहिती दिली आहे. 5 आणि 15 वर्ष वयोगटातील मुलांचं बायोमेट्रिक अपडेशन करणं अनिवार्य आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, बर्थ सर्टिफिकेट, रुग्णालयाकडून मिळालेल्या डिस्चार्ज स्लिपद्वारेही आधार केंद्रावर जाऊन आई-वडील आपल्या नवजात बाळाचं आधार कार्ड बनवू शकतात. Baal Aadhaar Card - लहान मुलांचं आधार कार्ड निळ्या रंगाचं असतं. निळ्या रंगाच्या आधार कार्डला बाल आधार कार्ड (Baal Aadhaar Card) असंही म्हणतात. बाल आधार कार्ड बनवण्यासाठी 5 वर्षाखाली लहान मुलाच्या आई किंवा वडिलांच्या आधार कार्डचा नंबर लिंक होतो. त्याशिवाय आई-वडिलांचा मोबाईल नंबरही रजिस्टर्ड होतो. - ज्या मुलांचं आधार कार्ड 5 वर्षांआधी बनवलं जातं, त्या मुलाचं बायोमेट्रिक विकसित नसल्याने, लहान मुलांच्या आधार एनरोलमेंटवेळी त्यांचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जात नाहीत. परंतु मुलं 5 वर्षांची झाल्यानंतर हे आधार कार्ड अपडेट करणं अनिवार्य आहे.

  (वाचा - 5 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांसाठी बनवा निळं Aadhaar कार्ड, जाणून घ्या संपूर्ण माहिती)

  - लहान मुलं किशोरावस्थामध्ये असतानाही त्यांच्या बायोमेट्रिक पॅरामीटरमध्ये बदल होत असतात. त्यामुळे मुलं 15 वर्षाची झाल्यानंतरही बायोमेट्रिक डिटेल्स पुन्हा एकदा अपडेट करावे लागतात. - लहान मुलांचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करणं पूर्णपणे मोफत आहे, यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card

  पुढील बातम्या