Home /News /technology /

Cyclone Tauktae: या वादळात तुमची कार किंवा बाईक डॅमेज झाली असल्यास, असा करा क्लेम

Cyclone Tauktae: या वादळात तुमची कार किंवा बाईक डॅमेज झाली असल्यास, असा करा क्लेम

तौक्ते चक्रीवादळात जर गाडी किंवा बाईक यांचं नुकसान झालं असेल तर विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देईल. विम्यासाठी कसा अर्ज कराल?

नवी दिल्ली, 19 मे : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दमण-दीव तसंच केरळ आणि कर्नाटकातील काही भागाला तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) मोठा तडाखा दिला आहे. या तडाख्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबईसह विविध ठिकाणी कार आणि बाईक (Car or Bike Insurance) चक्रीवादळ आणि पावसाने आलेल्या पाण्यात तरंगताना दिसत असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही ठिकाणी झाडं कोसळल्याने कार किंवा बाईकचं नुकसान झालंय. तौक्तेमुळे नुकसान झालेल्या गाड्यांची भरपाई देतील इन्शुरन्स कंपन्या - काही वर्षांपूर्वी केरळमध्ये मोठा पूर आला होता त्यावेळी इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDAI-इर्डा) नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची प्रक्रिया सोयीची करण्याचे आदेश इन्शुरन्स कंपन्यांना दिले होते. त्यानंतर या कंपन्यांनी ही प्रक्रिया (Insurance applying procedure) सोपी केली. तौक्ते चक्रीवादळात जर गाडी किंवा बाईक यांचं नुकसान झालं असेल तर विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देईल. विम्यासाठी कसा अर्ज कराल? 48 तासांच्या आत विमा कंपनीला करा फोन - मोटर इन्शुरन्समध्ये पूर, वादळ, वीज पडणं, भूस्खलन, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाहनाच्या होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईसाठी डॅमेज कव्हरमध्ये (Damage Cover) तरतूद असते. नैसर्गित आपत्तीत जर तुमच्या वाहनावर झाड किंवा अन्य कुठली वस्तू पडून त्याचं नुकसान झालं, तर त्याच परिस्थितीत 48 तासांच्या आता विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर फोन करा आणि घटनेची माहिती व वाहनाचे डिटेल्स द्या. तुम्ही वाहनावर पडलेलं झाड किंवा वस्तू काढायचा प्रयत्न केलात तर कदाचित वाहनाचं अजून नुकसान होईल आणि त्याचे पैसे तुम्हाला इन्शुरन्समध्ये मिळणार नाही.

(वाचा - Smartphone चोरी झाल्यास, या सरकारी पोर्टलच्या मदतीने असा करा ब्लॉक)

ऑनलाइन किंवा फोनवरून क्लेम करण्यासाठी - कोरोना काळामुळे ऑनलाईन किंवा मोबाईलमधून (Apply through Mobile or online) आपल्या विम्याचा क्लेम करण्याची परवानगी इन्शुरन्स कंपन्यांनी दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्या वाहनाचा बाहेरून आणि आतून फोटो काढून तो विमा कंपनीला पाठवा. प्रत्येक विमा कंपनीचं देशभरातील गॅरेजशी टाय अप असतं. आपण इन्शुरन्स क्लेम केल्यावर कंपनी वाहन गॅरेजला पाठवते आणि त्यांनी दुरुस्तीसाठी सांगितलेल्या खर्चाचा अंदाज घेते. तुम्ही घेतलेल्या विमा कव्हरच्या पटीत तुम्हाला नुकसान भरपाई देते. दुरुस्तीत वाहनाच्या कुठल्या भागाचे पैसे ग्राहकाला द्यावे लागतात? पॉलिसीत वर्णन केलेल्या पार्टच्या बाहेरचा पार्ट खराब झाला तर त्याचे पैसे ग्राहकाला भरावे लागतात. अपघात झाला तेव्हा जर गाडी मालक गाडी चालवत नसेल तर नुकसान भरपाई मिळत नाही. 50 हजार रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईचा दावा केला असेल, तर वाहनाचा पंचनामा करण्यासाठी सर्व्हेअरची (Surveyor) गरज नसते. एसयूव्ही किंवा लक्झरी वाहनाच्या दुरुस्तीला मोठा खर्च अपेक्षित असेल, तर विमा कंपनी लॉस असेसर नेमते तो नुकसानाचा अंदाज घेऊन विमा कंपनी किती नुकसान भरपाई देईल हे निश्चित करतो.

(वाचा - मोठी बातमी! उपचारासाठी, लसीकरणासाठी Aadhaar card अनिवार्य नाही,UIDAI कडून दिलासा)

या कारणांमुळे तुमचा दावा रद्द होऊ शकतो - मोठ्या आपत्तीत कंपन्या विमा रक्कम देतात पण काही वेळा पूर्ण दावा केलेली रक्कम देत नाही किंवा दावा फेटाळतात. त्यामुळे नुकसान झाल्याच्या 48 तासांच्या आत कंपनीला वाहनाची माहिती कळवा. वाहनाच्या रूपात अनधिकृतपणे बदल केले असतील तरीही कंपनी भरपाई देत नाही. तुम्ही जर तुमचं खासगी वाहन व्यापारी वापरासाठी दिलं असेल तरीही दावा फेटाळला जाऊ शकतो. सर्व्हेअरने वाहन पाहण्याच्याआधी कोणतीही दुरुस्ती करू नका.
First published:

Tags: Car, Insurance

पुढील बातम्या