Home /News /technology /

Free WI-FI ला मोबाईल कनेक्ट करायचाय? मग ही Trick वापरून बघाच

Free WI-FI ला मोबाईल कनेक्ट करायचाय? मग ही Trick वापरून बघाच

स्मार्टफोनवर इंटरनेटसाठी टेलिकॉम कंपन्यांकडून डेटा (Data) सुविधा मिळते. परंतु, हा डेटा मर्यादित स्वरूपाचा असतो. अधिक डेटा मिळवण्यासाठी मोठ्या रकमेचं रिचार्ज करावं लागतं.

  मुंबई, 12 एप्रिल:  बॅंकिंग, तिकिट बुकिंग, शॉपिंग, शासकीय योजनांसह विविध गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्या आहेत. आर्थिक व्यवहार असोत अथवा शैक्षणिक कामं, आता प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट (Internet) आवश्यक बनलं आहे. ही कामं स्मार्टफोनच्या (Smartphone) माध्यमातून सहजपणे करता येऊ शकतात. त्यामुळे अर्थातच स्मार्टफोनचं महत्त्व वाढलं असून तो आता गरजेची वस्तू बनला आहे. स्मार्टफोनवर इंटरनेटसाठी टेलिकॉम कंपन्यांकडून डेटा (Data) सुविधा मिळते. परंतु, हा डेटा मर्यादित स्वरूपाचा असतो. अधिक डेटा मिळवण्यासाठी मोठ्या रकमेचं रिचार्ज करावं लागतं. बऱ्याच वेळा डेटा पॅक लवकर संपतो. रिचार्ज करण्यासाठीदेखील काही अडचणी असू शकतात. अशा वेळी महत्त्वाची कामं खोळंबून राहण्याची शक्यता असते. अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी असलेली फ्री वाय-फाय (Free Wi-Fi) सुविधा फायदेशीर ठरू शकते. या वाय-फायशी कनेक्ट (Connect) होण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असते, याविषयी अनेकांना माहिती नसते. फेसबुकच्या (Facebook) मदतीनं फ्री वाय-फायशी कनेक्ट होऊन इंटरनेटचा वापर करता येतो. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. याबाबतची माहिती `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे. Smartphone Blast होण्याची भीती; या ट्रिक्स फॉलो करा आणि चिंताच सोडा
  स्मार्टफोनमधला इंटरनेट डेटा पॅक संपला, तर ऑनलाइन कामं करताना अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करणं सोपं आहे. फ्री वाय-फायचा वापर करून तुम्ही कामं पूर्ण करू शकता. फेसबुक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फ्री वाय-फाय सुविधा तुम्हाला अगदी सहज उपलब्ध करून देतो. त्यासाठी अर्थातच तुमचं फेसबुक अकाउंट असणं गरजेचं आहे. फेसबुकच्या माध्यमातून फ्री वाय-फाय सुविधा मिळवण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनवर अधिकृत फेसबुक अ‍ॅप (App) ओपन करावं. तेथे उजवीकडच्या सर्वांत वरच्या मेन्यूवर क्लिक करावं. त्यानंतर `सेटिंग्ज अँड प्रायव्हसी` या ऑप्शनमध्ये जावं. तेथे तुम्हाला `फाइंड वाय-फाय` हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावं. त्यानंतर फेसबुक तुमच्या आसपास असलेल्या सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटची (Hotspot) माहिती देईल. ठिकाणाचं नाव आणि नकाशा अशा दोन्ही प्रकारे ही माहिती मिळेल. तुम्हाला स्मार्टफोनच्या स्क्रीनवर हॉटस्पॉट दिसला नाही तर `सर्च अगेन `या ऑप्शनवर क्लिक करावं. त्यानंतर `सी मोअर` या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही वाय-फायचे आणखी पर्यायही शोधू शकता. या ठिकाणी तुम्हाला मोफत आणि सशुल्क अशा दोन्ही हॉटस्पॉटचे पर्याय उपलब्ध होतील.
  विशेष म्हणजे फ्री वाय-फायचा शोध घेण्यासाठी तुम्हाला फेसबुकव्यतिरिक्त अन्य अ‍ॅप्सची गरज नाही. ही सुविधा तुम्हाला अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते. या माध्यमातून तुम्ही कुठेही आणि केव्हाही मोफत इंटरनेट सुविधेचा लाभ घेऊ शकता.
  First published:

  Tags: Technology

  पुढील बातम्या