नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : फोटो शेयरिंग अॅप Instagram वर युजर्सला फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करता येतात. विशेषत: तरुणांमध्ये Instagram ची लोकप्रियता प्रचंड आहे. Instagram वर विविध प्रकारचा कंटेंट असतो. यापैकी सर्वच कंटेंट सर्वांचाच आवडतो असं होत नाही. काही कंटेंट (best content for Instagram post) युजर्सला आवडतो तर काहींना आवडत नाही.
पण आता युजर्सला त्यांच्या आवडीनुसार Instagram वर कंटेंट सेट करता येणार आहे. त्यासाठी युजर्सला Explore पेजला रिस्टोर किंवा Customize करावं लागेल. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन कंटेंट सेट करता येऊ शकतो.
काय आहे प्रोसेस?
Android किंवा iOS वर जाऊन स्मार्टफोनमधील सर्च हिस्ट्री क्लियर करायला हवं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर (Instagram) एक फ्रेश पेज दिसेल. त्यावर युजर्सला आवडीचा कंटेंट सेट करता येईल. त्यानंतर प्रोफाईल सेक्शनवर जाऊन उजव्या बाजूला असलेल्या Hamburger Menu वर क्लिक करा. त्यानंतर सेटिंगमध्ये Security Option वर क्लिक करा.
त्यात तुम्हाला Data And History List मध्ये सर्च हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Clear All चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर Pop-Up वरही Clear All करा. त्यानंतर सर्च हिस्ट्री क्लियर होईल आणि इन्स्टाग्रामवरील कंटेंट रिसेट होईल. त्यानंतर युजरला जो कंटेंट हवा आहे तोच पाहायला मिळेल.
दरम्यान काही दिवसांपूर्वी Instagram ने आणखी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. इन्स्टाग्राम टिकटॉक इन्स्पायर्ड फीचर टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हॉईस इफेक्ट जोडणार आहे. Instagram च्या टेक्स्ट-टू-स्पीच (Text to Speech Feature) फीचद्वारे युजरला व्हिडीओमध्ये आपल्या आवाजाचा उपयोग करण्याची सुविधा मिळेल.
इन्स्टाग्रामने व्हॉईस इफेक्टही (Voice Effect Feature) जोडले आहेत. या नव्या फीचरमुळे आता वेगवेगळ्या आवाजांसह व्हिडीओ बनवणं अधिक मजेशीर होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रील बनवण्यासाठी व्हॉईस आणि ऑडिओचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. हेच पाहता इन्स्टाग्राम नवे ऑडिओ व्हॉईस इफेक्ट आणि टेक्स्ट-टू-स्पीच हे टूल लाँच करणार आहे. iOS आणि Android युजर्ससाठी इन्स्टाग्रामवर हे नवं फीचर रोलआउट केलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post