मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'या' ठिकाणाहून फोन खरेदी कराल तर गाठाल तुरुंग,जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

'या' ठिकाणाहून फोन खरेदी कराल तर गाठाल तुरुंग,जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. दिवसभरात विविध कामांसाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. डिजिटायजेशनच्या (Digitization) विस्तारामुळे, शिक्षण आणि आपल्या बँक खात्यांसह इतर व्यवहारदेखील स्मार्टफोनमध्ये एकवटले आहेत.

पुढे वाचा ...

     मुंबई, 2 एप्रिल-  स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. दिवसभरात विविध कामांसाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. डिजिटायजेशनच्या (Digitization) विस्तारामुळे, शिक्षण आणि आपल्या बँक खात्यांसह इतर व्यवहारदेखील स्मार्टफोनमध्ये एकवटले आहेत. अशा स्थितीत लेटेस्ट फीचर्स (Latest Features) असलेला स्मार्टफोन्स घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. स्वत:साठी प्रीमियम स्मार्टफोन (Premium Smartphones) खरेदी करण्याची बहुतेकांची इच्छा असते. पण असा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. प्रत्येकालाच इतकी मोठी रक्कम देऊन स्मार्टफोन खरेदी करणं शक्य होत नाही. अशा लोकांसाठी मार्केटमध्ये काही शॉर्टकटदेखील उपलब्ध आहेत. ज्याठिकाणी कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन मिळू शकतात. अशा अंडरग्राउंड मार्केटमध्ये (Underground Market) 10 ते 20 हजार रुपयांमध्ये प्रीमियम फोन मिळतात. यामुळे अनेक लोक या मार्केटमधून स्मार्टफोन खरेदी करतात. परंतु, असं करणं तुमच्यासाठी संकटं घेऊन येऊ शकतात. प्रसंगी तुम्ही तुरुंगातही (Jail) जाऊ शकता. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    अंडरग्राउंड मार्केट्समध्ये कमी पैशात प्रीमियम स्मार्टफोन सहज उपलब्ध होतात. पण, हे असे अंडरग्राउंड मार्केट्स पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. तेथील बहुतेक गॅझेट्स (Gadgets) चोरीचे किंवा बनावट असतात. त्यामुळे अशा ठिकाणांवरून स्मार्टफोन खरेदी केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं. कारण, अशा मार्केटमध्ये अशा स्मार्टफोन्सची खरेदी-विक्री होते जे बेकायदेशीर (Illegal) कामासाठी वापरले गेलेले आहेत. तुम्ही येथून विकत घेतलेला स्मार्टफोन एखाद्याला धमकावण्यासाठी वापरला गेला असेल किंवा तो चोरीला गेलेला फोन असेल तर तुम्ही या स्मार्टफोनचे सध्याचे मालक म्हणून अडचणीत येऊ शकता.

    कुठलीही वस्तू खरेदी करताना ती जागरुकपणे करणं ही ग्राहकाची (Customer) जबाबदारी असते. त्यामुळे उत्पादनावरची माहिती, एक्पायरी डेट, पॅकिंग डेट वाचणं तसंच वॉरंटी कार्ड मागणं ही कामं आपणच करायला हवीत. हे करूनही आपल्याला फोन किंवा वस्तू चोरीची आहे हे कळणं शक्य नाही. अशावेळी पावती घेतली तर ती भविष्यात उपयोगी पडू शकते. निदान ही वस्तू त्या दुकानातून घेतली हे तरी पुराव्यानिशी आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. जाणीवपूर्वक कुणी अंडरमार्केट्समध्ये जात नाही. पण जरी परिस्थिती आली तरीही शक्यतो कमी पैशात मिळणाऱ्या जास्त किंमत असलेल्या वस्तू घेणं टाळावं.

    First published:

    Tags: Smartphone, Technology