दोन दिवसांत करा हे काम, अन्यथा बंद होईल तुमचा मोबाईल नंबर

दोन दिवसांत करा हे काम, अन्यथा बंद होईल तुमचा मोबाईल नंबर

ट्रायच्या नियमानुसार 7 कोटी लोकांना आपला नंबर सुरू ठेवायचा असेल तर दुसऱ्या टेलिकॉमकंपनीत पोर्ट करावा लागेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरीटी ऑफ इंडिया (TRAI)च्या नव्या नियमानुसार एअरसेल या टेलिकॉम कंपनीची सेवा 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. एअरसेलचं सीम वापरणारे जवळपास 7 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत या ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट केला नाही तर त्यांचं कार्ड बंद होऊ शकतं. याशिवाय पुन्हा अॅक्टिवेट होणार नसल्याचंही सांगितलं आहे. 4 ते 11 नोव्हेंबर या दिवसांमध्ये पोर्ट करण्याची सुविधा बंद असल्यामुळे 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याची माहिती ट्रायने दिली आहे.

2018 साली सुवातील एअरसेल कंपनीन त्यांच्या सुविधा ग्राहकांना देणं बंद केलं होतं. त्यांनंतर फेब्रुवारी 2018 रोजी ट्रायकडे युनीक पोर्टींग कोड देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. ज्याद्वारे ग्राहकांना आपला नंबर पोर्ट न करता इतर कोणत्याही एका कंपनीतील सेवेचा लाभ घेता येईल आणि त्यांची सेवा सुरु राहिल. मात्र ट्रायच्या अहवालानुसार 70 कोटी एअरसेल कंपनीचे ग्राहक आहेत. त्यांनी जर दिलेल्या तारखेपर्यंत त्यांचा नंबर पोर्ट केला नाही तर त्यांचं सिमकार्ड बंद होऊ शकतं. त्यानंतर तो नंबर पुन्हा तुम्हाला अॅक्टीवेट करता येणार नाही.

2018 साली एअरसेलने त्यांची सेवा बंद केली तेव्हा साधारण त्यांचे 9 कोटी युझर्स होते. 22 फेब्रुवारी 2018 रोजी एअरसेलने ट्रायसमोर प्रस्ताव ठेवून यूपीसी कोड देण्याची विनंती केली. 28 फेब्रुवारी रोजी ट्रायने एअरसेलला पहिला एडिशनल कोड दिवा.त्या कोडनंतर 28 फेब्रुवारी ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत जवळपास 19 लाख ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट केल्याची माहिती मिळत आहे. ट्रायच्या आदेशानुसार आता उर्वरित ग्राहकांना आपला नंबर 31 ऑक्टोबरपर्यंत तातडीने पोर्ट करणं आवश्यक आहे. अन्यथा एअरसेलचं सिमकार्ड बंद करण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही तुमचा नंबर सुरू करू शकणार नाही.

यूपीसी कोड कसा जनरेट कराल?

एअरसेल ग्राहकांना मॅन्युअली यूपीसी कोड जनरेट करावा लागेल. ग्राहकांना मॅन्यूअली नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मेसेज ऑपशन निवडा तिथे PORT टाइप करा आणि 1900 यानंबरवर मेसेज पाठवून द्या. फोनमध्ये बॅलन्स नसेल तर हा मेसेज जाणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आपल्या फोनला बॅलन्स असायला हवा. किमान 2 रुपये तरी. काही मिनिटांमध्ये तुमच्या नंबरवर यूनीक पोर्टींग कोड म्हणजेच UPC चा एक मेसेज येईल. तुम्हाला ज्या कंपनीमध्ये पोर्ट करण्याची इच्छा आहे तिथल्या सर्विस प्रोवायडरच्या मदतीने तुम्ही तुमच्या नंबर पोर्ट करू शकता. या सगळ्या प्रक्रियेला म्हणजेच नंबर पोर्ट होण्यासाठी साधारण 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. जर तुम्ही एअरसेलचे ग्राहक असाल आणि नंबर पोर्ट अजूनही केला नसेल तर त्वरित तो करुन घ्या अन्यथा तुमचा नंबर बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या टेलिकॉम सर्विस प्रोवायडर किंवा ऑपरेटरसोबत संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

फेरीवाल्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, महिलेला केली जबर मारहाण

Published by: Kranti Kanetkar
First published: October 29, 2019, 2:11 PM IST
Tags: TRAI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading