Home /News /technology /

Mobile चोरी झाला तर तातडीने फॉलो करा या स्टेप्स; पैसे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट होतील सुरक्षित

Mobile चोरी झाला तर तातडीने फॉलो करा या स्टेप्स; पैसे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट होतील सुरक्षित

कधी तुमचा फोन चोरी झाला किंवा ओळखीतल्या व्यक्तिचा फोन चोरी झाल्यास वर दिलेले काही पर्याय वापरून तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम आणि पर्सनल डिटेल्स सुरक्षित ठेवू शकता.

    आपला फोन (phone) आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आपण जिथे जातो तिथं स्मार्टफोन किंवा मोबाईल बरोबर घेऊन जातो. तो फक्त कॉलिंगसाठी वापरतो असंही नाही. फोनही स्मार्ट झाला आहे त्यामुळे आपण त्यातील अनेक फीचर्सचा वापर करतो. आपल्या फोनमध्ये केवळ फोटोज (photos) आणि व्हिडिओ (video) नाही तर आपले अनेक पर्सनल डिटेल्स (personal details) असतात. नोटाबंदीनंतर आपण डिजिटलायजेशनकडे वळलो आणि कोरोनामुळे आपले सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. आपल्या बँकेचे व्यवहार आपण फोनद्वारे करतो त्यामुळे आपल्या बँकिंग डिटेल्सही (banking details) त्यात असतात. त्यामुळे एखाद्या चोराने जर आपला फोन चोरला तर तो त्यातील बँकिंग डिटेल्स आणि इतर माहिती अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा फोन असा हरवला तर तुमचा जीव टांगणीला लागतो. काय करावं हे धड सुचत नाही. पण काळजी करू नका तुमचा फोन चोरीला गेल्यास तुम्ही काय करावं, हेच आज आम्ही सांगणार आहोत. खाली दिलेल्या काही स्टेप्सचा वापर करून तुम्ही ऑनलाइन फसवणूक (online fraud) होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. जेणेकरून तुमच्या बँक अकाउंटमधील (bank account) रक्कम सुरक्षित राहील. याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. सिम कार्ड ब्लॉक करा - तुमचा फोन चोरीला गेल्यास सर्वात आधी तुम्हाला तुमचं सिमकार्ड ब्लॉक (block the sim card) करावं लागेल. जेणेकरून तुमची पर्सनल माहिती लीक होणार नाही. त्यासाठी टेलिकॉम ऑपरेटरला (telecom operator) फोन करून सिम ब्लॉक करण्यास सांगा. तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा टोल फ्री नंबर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळू शकतो. ते तातडीने कार्ड ब्लॉक करू शकतात. इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगचा अॅक्सेस ब्लॉक करा - तुमचा फोन चोरी झाल्यानंतर वेळ न घालवता तुमचं अकाउंट असलेल्या बँकेत फोन करा आणि त्यांना तुमची ऑनलाइन बँकिंग सर्व्हिस (online banking service) बंद करण्यास सांगा. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. कारण जर तुमच्या बँकेनेच सेवा बंद केली तर चोराला त्याचा अक्सेस मिळणार नाही आणि आपोआप तुमचं बँक अकाउंट सुरक्षित राहील. हे ही वाचा-32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स बँकेत जाऊन नंबर बदला तुम्ही फोन नंबर ब्लॉक केल्यानंतरही तुम्हाला बँकिंग डिटेल्स लिक होण्याची भिती वाटत असेल तर तुम्ही बँकेत जाऊन अकाउंटसोबत लिंक केलेला नंबर बदलून घ्या. तसेच पासवर्डदेखील रिसेट करून घ्या. हे का करायचं तर ही ऑनलाईन यंत्रणा तुम्ही बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरशी लिंक असते. तोच बदलला गेला तर पुढे ट्रॅन्झॅक्शनच होणार नाहीत. आधार सेंटरमध्ये जाऊन मोबाइल नंबर बदला आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. तिथंही आपण फोन नंबर दिलेला असतो. बँकेच्या व्यवहारांवेळी ते लिंक केलेलं असतं त्यामुळे जर चोरांना तुमचा आधार ऑथेंटिकेशना अॅक्सेस मिळाला तर ते काहीही करू शकतात. त्यामुळे फोन हरवल्यानंतर लगेच आधार सेंटरमध्ये (Aadhar centre) जाऊन आधार कार्डाशी संलग्न मोबाईल नंबर बदलून घ्या. ऑनलाइन पेमेंट्स अॅपचा अॅक्सेस काढा - फोन हरवल्यानंतर अॅपच्या हेल्पडेस्कवर फोन करा. त्यांना सांगून फोन पे, गूगल पे आणि पेटीएम वॉलेट बंद करा. याबाबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची वॉलेट तुम्ही स्वतः बंद करायला गेलात तर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल तो ओटीपी तुमच्या त्याच नंबरवर जाईल आणि चोरांना आयता फायदा होईल. त्यामुळे पेमेंट्स अपच्या हेल्प डेस्कची मदत घेणं योग्य राहील. सोशल मीडिया अकाउंट्स डिअॅक्टिव्हेट करा - फोन चोरणाऱ्याने जर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा (social media accounts) अॅक्सेस मिळवला तर तुमचे डिटेल्स त्याला मिळतील. त्यामुळे तुमच्याची फसवणूक होऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स दुसऱ्या फोनवरून किंवा वेबसाइटवर लॉग इन करून डिअॅक्टिव्हेट करा अथवा पासवर्ड रिसेट करा. कधी तुमचा फोन चोरी झाला किंवा ओळखीतल्या व्यक्तिचा फोन चोरी झाल्यास वर दिलेले काही पर्याय वापरून तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम आणि पर्सनल डिटेल्स सुरक्षित ठेवू शकता.
    First published:

    Tags: Mobile, Online payments

    पुढील बातम्या