Home /News /technology /

महिलेचं Instagram हॅक करुन केली पैशांची मागणी, असं झाल्यास सर्वात आधी करा हे काम

महिलेचं Instagram हॅक करुन केली पैशांची मागणी, असं झाल्यास सर्वात आधी करा हे काम

हॅकर्स इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करतात आणि त्याबदल्यात पैशांची मागणी करतात. जर तुम्ही कधीही अशा स्थितीत अडकल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल.

  नवी दिल्ली, 12 एप्रिल : सोशल मीडिया साइट्सचा सर्रास वापर होत असताना, दुसरीकडे हे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होण्याचे, सायबर क्रिमिनल्सकडून त्याचा गैरवापर होण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आला. मुंबईतील खार इथे एका महिलेचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक (Instagram Account Hacked) करण्यात आलं. मुंबईतील खार येथे राहणाऱ्या एका महिलेला इंटरनॅशनल नंबरवरुन पैशांची मागणी करण्यात आली. 33 वर्षीय महिलेला WhatsApp वर सलग तीन वेळा मेसेज आले. या मेसेजमध्ये हॅकर्सने त्या महिलेचं हॅक केलेलं इन्स्टाग्राम अकाउंट परत मिळवण्यासाठी 150 डॉलरची मागणी केली. अशा मेसेजनंतर महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. खार पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरू केला. अकाउंट हॅक झाल्यास काय कराल? सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार कोणासोबतही घडू शकतो. हॅकर्स इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करतात आणि त्याबदल्यात पैशांची मागणी करतात. तुम्ही कधी अशा स्थितीत अडकल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल.

  हे वाचा - Smartphone चा असा वापर जीवावर बेतू शकतो, तुम्हालाही या सवयी आहेत का?

  Instagram वर अनेक फीचर्स आहेत. त्यात एक ऑप्शन हेल्प सेंटरचा आहे. इथे युजर्स अशा स्थितीबाबत माहिती मिळवू शकतात. इथे युजर्सच्या हॅक्ड अकाउंट्सच्या ऑप्शनवर जावं लागेल. आता युजर्सला चार पर्याय मिळतील, जे वेगवेगळ्या परिस्थीतीशी जोडलेले असतील. तुम्ही तुमच्या समस्येनुसार पर्याय निवडू शकता आणि त्यात मिळणाऱ्या माहितीचा वापर करू शकता. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यास काही पर्याय मिळतील. अशात इन्स्टाग्राम युजरला security@mail.instagram.com कडून मेल येईल, ज्यात ईमेल अॅड्रेसमध्ये बदल आणि इतरही काही पर्याय दिले जातील. जर हे बदल तुम्ही केलेले नसतील तर तुम्ही त्यावर रिव्हर्ट करू शकता. जर तुम्ही ईमेल अॅड्रेस बदलू शकत नसाल, तर तुम्ही लॉगइन लिंक किंवा सिक्योरिटी कोडसाठी रिक्वेस्ट करू शकता. जर असं करुनही तुमचं अकाउंट रिकव्हर होऊ शकलं नाही, तर तुम्ही इन्स्टाग्रामवरुन सपोर्ट मागू शकता. त्याशिवाय इतरही काही पर्याय मिळतात, त्याचाही तुम्ही वापर करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Instagram, Instagram post, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या