मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता ही बँक देणार WhatsApp वरही सुविधा, एका मेसेजने मिळतील बँकिंग डिटेल्स

आता ही बँक देणार WhatsApp वरही सुविधा, एका मेसेजने मिळतील बँकिंग डिटेल्स

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने आता तुम्हाला बँकेतील कामंही करता येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने (ICICI WhatsApp) ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने आता तुम्हाला बँकेतील कामंही करता येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने (ICICI WhatsApp) ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने आता तुम्हाला बँकेतील कामंही करता येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने (ICICI WhatsApp) ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

  नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेंजिंग अ‍ॅप आहे. फोटो, व्हिडीओ, ऑडिओ कॉल, व्हिडीओ कॉल अशा अनेक सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर मिळत असल्याने याचा वापरही मोठा प्रमाणात होत आहे. तसंच व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसच्या (WhatsApp Business) माध्यमातून लोक व्यवसायही करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसेही पाठवण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमुळे लोकांना संवाद साधण्यासाठी चांगला आणि सोपा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. याच व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने आता तुम्हाला बँकेतील कामंही (Bank on WhatsApp) करता येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने (ICICI WhatsApp) ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

  कित्येक बँकांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी इंटरनेट बँकिंग किंवा बँकिंग अ‍ॅप्स उपलब्ध करुन दिली आहेत. याच्या माध्यमातून लोक घरबसल्या बँकेतील कामं करू शकणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने थेट व्हॉट्सअ‍ॅपवरच (ICICI WhatsApp) सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आयसीआयसीआय बँक ऑन व्हॉट्सअ‍ॅप (ICICI Bank on WhatsApp) या सुविधेमार्फत केवळ एका मेसेजच्या माध्यमातून तुमची सगळी कामं होऊ शकतील.

  जर तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल, तर फोनमध्ये 8640086400 हा नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर सेव्हिंग्स अकाउंटला (Saving Account) लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुन (Mobile number linked with savings account) या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवावा लागेल किंवा या नंबरवरमिसकॉलही करू शकता. याशिवाय 9542000030 या नंबरवर OPTIN असं लिहून एक SMS ही करू शकता.

  Google Chrome चा वापर करता का? लगेच करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी

  ही सेवा हिंदीमध्ये (ICICI Bank on WhatsApp in Hindi) हवी असेल, तर 9324953010 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करू शकता.

  यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर आयसीआयसीआय बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची (Services on ICICI WhatsApp) यादी मिळेल. यापैकी तुम्हाला जे काम करायचं आहे, त्याबाबत तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अकाउंट बॅलन्स, शेवटचे तीन ट्रान्झेक्शन, क्रेडिट कार्ड लिमिट अशा गोष्टी तपासू शकता. तसंच, तुमचं कार्ड ब्लॉक आणि अनब्लॉक करणं, एफडी, इन्स्टंट लोन, बिल पेमेंट, ट्रेड सर्व्हिस आणि इंस्टासेव्ह (InstaSave) अशा इतर सुविधा तुम्ही आयसीआयसीआय बँक ऑन व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमातून मिळवू शकता.

  तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवतील या स्मार्ट Tips, वाचा Security Tricks

  बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा 24 तास, वर्षांचे 365 दिवस उपलब्ध असणार आहे. म्हणजेच अगदी सुट्टीच्या दिवशीही या नंबरवर मेसेज करुन आपल्या खात्याबाबत माहिती घेता येईल. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस एंड टू एंड इनक्रिप्टेड (End to End Encrypted) असल्यामुळे हे व्यवहार सुरक्षित राहणार असल्याचं बँकेने म्हटलं आहे.

  First published:

  Tags: Tech news, Whatsapp, WhatsApp user