अॅपलचा 5s मिळणार फक्त 15 हजार रुपयांना

अॅपलचा 5s मिळणार फक्त 15 हजार रुपयांना

भारतामध्ये या स्मार्टफोनची किंमत कमी होऊन 15 हजारांवर येणारेय. तसंच हा स्मार्टफोन एक्सक्लुझिव्हली ऑनलाईन उपलब्ध होईल.

  • Share this:

10 मे : अॅपल लवकरच आपल्या 'i phone 5s ' या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट करणारेय. भारतामध्ये या स्मार्टफोनची किंमत कमी होऊन 15 हजारांवर येणारेय. तसंच हा स्मार्टफोन एक्सक्लुझिव्हली ऑनलाईन  उपलब्ध होईल.

लेनोव्हो, सॅमसंग, मोटोरोला यांसारख्या कंपन्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन उपलब्ध करून देतायत. त्यामुळेच अॅपलने घेतलेल्या या निर्णयामागं, मोबाईल कंपन्यांमधील वाढलेली स्पर्धा हेच प्रमुख कारण मानलं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित या कंपनीने 2013 साली लाँच केलेल्या या स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्याबाबत निर्णय घेतलाय.  अगोदर याच ' i phone 5s 'ची किंमत 17,500 रु. इतकी होती. जरी या फोनला लाँच होऊन ४ वर्ष झाली असली तरीहीदेखील त्याची लोकप्रियता अद्यापि मार्केटमध्ये कायम आहे.

या स्मार्टफोनची किंमत कमी होण्याची कारणं काहीही असोत तरीही ' i phone ' वापरण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र ही नक्कीच खूशखबर आहे.

First published: May 10, 2017, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading