हुंदाईची फॅमिल कार 'सँट्रो' पुन्हा येतेय !

हुंदाईची फॅमिल कार 'सँट्रो' पुन्हा येतेय !

  • Share this:

21 नोव्हेंबर : हुंदाईची फॅमिल कार सँट्रो पुन्हा एकदा नव्या रुपात भारतात दाखल होणार आहे. 2014 मध्ये सँट्रोचं उत्पादन बंद केल्यानंतर आता पुन्हा एकदा सँट्रोला रिलाँच करण्यात येणार आहे.

हुंदाई सँट्रोला पुढील वर्षी भारतात लाँच करणार आहे. ही कार अगदी फॅमिली बजेट लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. आॅल न्यू सँट्रोला आॅटो एक्सपो 2018 मध्ये सादर करण्यात येणारआहे. इंडियन आॅटोमोबाईल मार्केटमध्ये न्यू सँट्रो कमबॅक करून मारुती सुझुक सॅलेरिओ, रेनो क्विड आणि टाटा टियागोला टक्कर देणार आहे.  न्यू सँट्रोच्या टेस्टिंगचे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोवरून न्यू सँट्रोही जुन्हा सँट्रोसारखीच टालबाॅय डिझाईनमध्ये असणार आहे.

छायाचित्र सौजन्य Rushlane

मिळेल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम

दक्षिण कोरियाई कंपनी गेल्या काही दिवसांपासून या माॅडेलवर काम करत आहे. न्यू सँट्रोच्या टाॅप इंड माॅडेलमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट असणार आहे. जे फोटो व्हायरल झाले आहे त्यावरून न्यू सँट्रोचा लूक हा जवळपास ग्रँड i10शी जुळतोय.

दोन इंजिनचे पर्याय

न्यू सँट्रोमध्ये 0.8 लीटर आणि 1.0 लीटरचा पर्याय देण्यात येणार असल्याचं कळतंय. सोबतच यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन असेल. हुंदाई न्यू सँट्रोमध्ये AMT आॅफ्शन पर्याय म्हणून देऊ शकतं. या नव्या सँट्रोच्या रुपाने हुंदाई पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपलं उत्पादन वाढवण्यावर भर देणार आहे. या नव्या सँट्रोची किंमत अंदाज 3.5 लाखांपासून पुढे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याच्या प्लॅन करत असाल आणि त्यातच जर सँट्रो कारचे प्रेमी असाल तर थोडी वाट पाहा...

First published: November 21, 2017, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading