Elec-widget

Hyundai ने ग्राहकांकडून परत मागवल्या कार, गाड्यांमध्ये आहे प्रॉब्लेम

Hyundai ने ग्राहकांकडून परत मागवल्या कार, गाड्यांमध्ये आहे प्रॉब्लेम

Hyundai या कंपनीने त्यांच्या दोन कारची मॉडेल्स परत मागवली आहेत. यामध्ये Grand i10 आणि Xcent या मॉडेल्सचा समावेश असून एकूण 16,409 सीएनजी गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : Hyundai या कंपनीने त्यांच्या दोन कारची मॉडेल्स परत मागवली आहेत. यामध्ये Grand i10 आणि Xcent या मॉडेल्सचा समावेश असून एकूण 16,409 सीएनजी गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत. या कारची निर्मिती 1 ऑगस्ट 2017 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत करण्यात आली आहे. कंपनीने म्हटलं की, सीएनजी फिल्टर अॅसेंब्लीमध्ये त्रुटी असल्याने गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. या सर्व कारमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट देण्यात आलं आहे.

ह्यूंदाईने जारी केलेल्या नोटिसीत म्हटलं आहे की, या कार नॉन-एबीएस मॉड़ेलच्या आहेत. अशा परिस्थितीत शक्यता आहे की, परत मागवण्यात आलेल्या कारमध्ये सर्वाधिक प्राइम मॉडेल म्हणजेच टॅक्सी सर्विसमध्ये असलेल्या कारचा समावेश असेल.

कंपनीने परत मागवलेल्या कारचे चेकिंग करण्यासाठी 25 नोव्हेंबरपासून ह्युंदाईचे वर्कशॉप सुरू करण्यात येईल. यासाठी कंपनी डीलर्सच्या माध्यमातून कार मालकांशी संपर्क करेल. वर्कशॉपमध्ये कार चेंकिंगसाठी एक तासाचा वेळ लागेल. कारच्या सीएनजी फिल्टर अॅसेंब्लीमध्ये त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त करण्यात य़ेईल. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ह्युंदाईची प्राइम मॉडेल्स खरंतर नव्या कारचे जुनं व्हर्जन आहेत. सध्या ग्रँड आय़10 आणि अॅक्सेंट फ्लीट (टॅक्सी सर्विस) साठी उपलब्ध आहेत. कंपनीने मर्यादित कालावधीसाठी फर्स्ट जनरेशन अॅक्सेंटला सीएनजीसह उपलब्ध करून दिलं होतं. सेकंड जनरेशन अॅक्सेंटमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी देण्यात आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hyundai
First Published: Nov 20, 2019 11:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com