एक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे !, हे आहेत फिचर आणि किंमत

एक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे !, हे आहेत फिचर आणि किंमत

रिअर कॅमेऱ्यामध्ये 40 मेगापिक्सल RGB सेंसर लेंस, 20 मेगापिक्सल मोनोक्रोम लेंस आणि 8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेंस देण्यात आलीये

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : पूर्वी एका कॅमेऱ्याचा फोन होता आणि आजही आहे पण आता आहे ती दोन कॅमेऱ्यावाल्या फोनची क्रेझ...पण थांबा आता हुवावे या कंपनीने चक्क तीन रिअर कॅमेऱ्याचा फोन लाँच केलाय.

हुआवेने भारतात प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन P20 प्रो आणि P20 लाईट हे दोन मोबाईल फोन लाँच केले आहे. P20 प्रोमध्ये तीन रिअर कॅमेरे तर P20 लाईटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. P20 सीरिजच्या फोनमध्ये लेसिका लेंस आणि AI कॅमेरा दिलेला आहे.  P20 प्रो ची स्क्रिन 6.1 इंच आकाराची आहे.  तसंच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा फोन वॉटर-डस्ट रेजिस्टंट आहे.

नवीन काय ?

या फोनमध्ये एक नव्हे तीन रिअर आणि एक फ्रंट असे मिळून चार कॅमेरे आहे. रिअर कॅमेऱ्यामध्ये 40 मेगापिक्सल RGB सेंसर लेंस, 20 मेगापिक्सल मोनोक्रोम लेंस आणि 8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेंस देण्यात आलीये. त्यामुळे फोटो शौकिनासाठी ही एक चांगली ट्रिट ठरणार आहे.

किंमत

हुआवेने P20 प्रोची किंमत 64 हजार 999 रुपये ठेवली आहे, तर P20 लाईटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. दोन्हीही स्मार्टफोन अमेझॉन एक्स्लुझिव्हवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याची विक्री 3 मे रोजीपासून सुरू होणार आहे.  हुआवे P20 प्रो ग्रेफाईट ब्लॅक, मिडनाईट ब्ल्यू कलरमध्ये फोन उपलब्ध असतील.

असा आहे P20 Pro

- अँड्रॉईड 8.1 ओरिओ

- 6.1 इंच आकाराची स्क्रीन

- रिअर बॉडीवर फिंगरप्रिंट सेन्सर

- 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज

- IP67 सर्टिफाईड (वॉटर-डस्ट रेजिस्टंट)

- तीन रिअर कॅमेरा, 40 मेगापिक्सल RGB सेंसर लेंस, 20 मेगापिक्सल मोनोक्रोम लेंस आणि 8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेंस

- 24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

- 4000mAh क्षमतेची बॅटरी

--------------------------

असा आहे P20 लाईट

- ओरिओ 8.0

- 5.84 इंच आकाराची स्क्रीन

- 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज

- 16MP2MP कॉम्बिनेशनचा ड्युअल रिअर कॅमेरा

- 3000mAh क्षमतेची बॅटरी

- 19 हजार 999 रुपये

First published: April 24, 2018, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading