• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • बाजारात लाँच झाली इलेक्ट्रॉनिक 'लिप्स्टिक', 22 तासांपर्यंत चालेल बॅटरी; वाचा काय आहे खास

बाजारात लाँच झाली इलेक्ट्रॉनिक 'लिप्स्टिक', 22 तासांपर्यंत चालेल बॅटरी; वाचा काय आहे खास

Huawei ने या लेटेस्ट इयरबड्सच्या चार्जिंग केसला एका लिप्स्टिकच्या आकारात तयार केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : चिनी कंपनी Huawei ने नवे वायरलेस इयरबड्स Huawei FreeBuds Lipstick लाँच केली आहे. लिप्स्टिकसारख्या दिसणाऱ्या या इयरबड्सला अनेकांची पसंतीही मिळते आहे. यापूर्वी कोणत्याही कंपनीने अशाप्रकारचे इयरबड्स कधीही बनवले नव्हते. Huawei ने या लेटेस्ट इयरबड्सच्या चार्जिंग केसला एका लिप्स्टिकच्या आकारात तयार केलं आहे. याचे इयरबड्स Apple च्या AirPods Pro सारखे दिसतात. Apple चे AirPods पांढऱ्या रंगाचे आहेत, तर Huawei चे हे इयरबड्स लाल रंगात लाँच करण्यात आले आहेत. काय आहेत फीचर्स - अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह यात 14.3mm चे ड्राइवर्स, टच कंट्रोल्स, ब्लूटूथ v5.2 सपोर्ट आणि एकदा चार्ज केल्यानंतर 22 तासांचा प्लेबॅक टाइम मिळेल. Huawei चे हे इयरबड्स IPX4 रेटिंगसह येतात. म्हणजेच इयरबड्स वॉटरप्रूफ आहेत. त्यामुळे पाण्यात खराब होण्याचा धोका नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह ऑफ करुन हे इयरबड्स 22 तासांपर्यंत चालू शकतात. Huawei चे हे इयरबड्स सध्या केवळ युरोपमध्ये लाँच केले गेले आहेत. युरोपमध्ये याची किंमत $290 आहे म्हणजेच भारतीय रुपयानुसार जवळपास 21,748 रुपये आहे. Huawei इयरबड्स भारतासह इतर देशात कधी लाँच केले जातील, तसंच याची किंमत काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  Online fraud आणि QR Code फसवणुकीपासून असा करा बचाव, या गोष्टी ठरतील फायदेशीर

  दरम्यान, एकीकडे आपण 5G ची वाट बघत असतानाच दुसरीकडे मात्र अमेरिका (America)आणि चीन (China) हे देश 5Gच्या समोर जाऊन आता 6G च्या मागे लागले आहेत. 6G इंटरनेटचं पेटंट (Patent) मिळवण्यासाठी या देशांमध्ये चढाओढ सुरु आहे. 5G इंटरनेटच्या लाँचिंगनंतर अमेरिकेमुळे चीनच्या काही कंपन्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र Huawei कंपनीनं 5G च्या आकर्षक किमती ग्राहकांना दिल्या त्यामुळे अमेरिकी कंपन्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे चीन 5G लीडरच्या भूमिकेत दिसून आला होता.

  Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

  विशेष म्हणजे चीननं नोव्हेंबरमध्ये 6G ट्रान्समिशनसाठी एयरवेव्सची चाचणी करण्यासाठी एक सॅटेलाईट लाँच केलं होतं. तसंच कॅनेडामध्ये Huawei कंपनीचं एक 6G संशोधन केंद्रही आहे.
  Published by:Karishma
  First published: