HTCचा नवा स्क्विज स्मार्टफोन आहे कसा?

HTCचा नवा स्क्विज स्मार्टफोन आहे कसा?

स्क्विज म्हणजे सहजपणे एखादी वस्तू दाबता येणं. त्याचप्रकारे स्क्विज टेक्नाॅलॉजी असलेल्या या हँडसेटमध्ये प्रेशर सेंसर देण्यात आलं आहे.

  • Share this:

20 जून : कोणी मोबाईल स्क्विज केल्याचं आपण कधी ऐकलं आहे का? होय हे खरं आहे. HTCने नुकताच U11 या नावाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. HTC च्या या U11 स्मार्टफोनमध्ये एजसेन्स स्क्विज टेक्नाॅलॉजीयुक्त डिस्प्ले देण्यात आला आहे. आजकाल अशा नवनवीन टेक्नाॅलॉजी असलेल्या स्मार्टफोनच्या या दुनियेत HTC U11ची स्क्विज टेक्नॅलॉजी सगळ्यात युनिक आहे. चला तर मग पाहुयात कशाप्रकारे स्क्विज करता येईल HTC चा हा नवा U11 स्मार्टफोन.

स्क्विज म्हणजे सहजपणे एखादी वस्तू दाबता येणं. त्याचप्रकारे स्क्विज टेक्नाॅलॉजी असलेल्या या हँडसेटमध्ये प्रेशर सेंसर देण्यात आलं आहे. या फोनच्या सेन्सेटिव्ह जागी आपण स्क्विज म्हणजेच प्रेस केल्यास आपल्याला हव्या असलेल्याच  अॅक्शनला फोन डिटेक्ट करतो. म्हणूनच HTCने एजसेन्स असं नाव दिलं आहे.

HTC ने या टेक्नाॅलॉजी सोबतच HTC U11 मध्ये पावर बटन, वॉल्यूम बटन आणि फ्रंटला फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा देण्यात आलं आहे. यामध्ये यूजर्स ते सर्व काम करू शकतात जे बाकी स्मार्टफोनमध्ये सुद्धा केलं जातं. या स्मार्टफोनमधील नाविन्य इतकंच की या HTC U11 मध्ये यूजर्सना एक नवीन टेक्नोलॉजीचा अनुभव घेता येतो.

या स्क्विज टेक्नाॅलॉजीचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो, ते पाहुयात

यामध्ये HTC ने आधीच बरेचशे ऑप्शन दिले आहेत.

कॅमेरा ओपन करू शकतो. फोटो क्लिक करताना फोकस सेट करू शकतो. याचसोबत जर फ्रंट कॅमेरा चालू असेल तर थोडा वेळ स्क्विज केल्याने रियर कॅमेरा ओपन होतो.

तुमचा की-बोर्ड ऑन असताना जर तुम्ही स्क्विज केल तर तुम्ही वॉइजने सुद्धा टाइप करू शकता.

या टेक्नाॅलॉजीचा वापर करून तुम्ही गुगल असिस्टेंट ओपन करू शकता. आणि यामध्ये यूजर्स सेटिंग चेंज करून वेगवेगळे अॅप्लिकेशन्ससुद्धा ओपन करू शकतात, त्याचबरोबर स्क्रीनशॉट, टॉर्च चालू करणं, वॉइस रेकाॅर्डिंगसारखी कामंही करता येतात.

या व्यतिरिक्त HTC ने यामध्ये खूप सारे कस्टमाइजेशनचे ऑपशन्स दिले आहेत, ज्यामुळे यूजर्सना बरीचशी कामं करता येऊ शकतात, त्यातील एक म्हणजेच wi-fi हॉटस्पॉट ओपन करणे.

अशा प्रकारे या एजसेंस स्क्विज टेक्नाॅलॉजीचा आपल्याला अनुभव घेता येणार आहे.

First published: June 20, 2017, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading