मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नंबर सेव्ह न करताच iPhone वर पाठवता येणार WhatsApp मेसेज, पाहा सोपी प्रोसेस

नंबर सेव्ह न करताच iPhone वर पाठवता येणार WhatsApp मेसेज, पाहा सोपी प्रोसेस

आता iOS असलेल्या आयफोन डिव्हाइसवर युजर्सला कोणताही नंबर सेव्ह केल्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार आहे. पाहा काय आहे प्रोसेस...

आता iOS असलेल्या आयफोन डिव्हाइसवर युजर्सला कोणताही नंबर सेव्ह केल्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार आहे. पाहा काय आहे प्रोसेस...

आता iOS असलेल्या आयफोन डिव्हाइसवर युजर्सला कोणताही नंबर सेव्ह केल्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार आहे. पाहा काय आहे प्रोसेस...

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : प्रसिद्ध मेसेजिंग App WhatsApp चा देशात Android आणि iOS युजर्स मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून युजर्सला अतिशय सोप्या पद्धतीने त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या (how to send message on whatsapp without saving number) लोकांना मेसेज पाठवता येतो. केवळ मेसेज नाही, तर फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, पेमेंट अशा अनेक सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतात.

परंतु अनेकवेळा युजर्सला काही सेव्ह नसलेल्या नंबर्सवर काही मेसेजेस आणि डॉक्युमेंट्स पाठवावे लागतात. युजर्सला अशा काही नंबर्सची काही वेळासाठी गरज असते (how to send whatsapp message to multiple unsaved number) त्यामुळे हे नंबर्स सेव्ह करणंही गरजेचं नसतं. अशा वेळी नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा हा प्रश्न असतो. परंतु काही ट्रिकने आता iOS असलेल्या आयफोन डिव्हाइसवर युजर्सला कोणताही नंबर सेव्ह केल्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार आहे.

Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

अशी आहे प्रोसेस -

iPhone मध्ये सर्वात आधी Shortcuts App ला ओपन करा. त्यानंतर ऑल शॉर्टकट्सवर क्लिक करा. यावेळी शॉर्टकट्सला कोणतंही एखादं नाव देऊन Icon वर क्लिक करा. त्यानंतर App आणि Action Bar साठी सर्च ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर सर्च फील्डमध्ये Safari टाईप करा. त्यानंतर (how to whatsapp without saving number on iphone) युजर्सला Open URLs वर क्लिक करावं लागेल. URLs टाकल्यानंतर त्याच्या Address मध्ये me/ टाईप करा. त्यानंतर कीबोर्डवर Ask Each Time वर क्लिक करावं लागेल. ते झाल्यानंतर Done ऑप्शनवर क्लिक करा.

PAN Card वरील सही-फोटो बदलायचा आहे? घरबसल्या असं करा Update

त्यानंतर प्ले किंवा नेक्स्ट बटणवर क्लिक केल्यानंतर तो WhatsApp नंबर टाका ज्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर त्या नंबरच्या आधी संबंधित देशाचा कोडही टाकावा लागेल. तो कोड टाकताना त्यात + चा वापर करू नये. भारतातील युजर्ससाठी 91 या कोडचा वापर करता येईल. नंबर टाकल्यानंतर Done च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Privacy Alert Pop-Up चा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यानंतर त्याला Allow केल्यानंतर आयफोन युजर्सला कोणताही नंबर सेव्ह केल्याशिवाय त्याला WhatsApp वर मेसेज करता येईल.

First published:

Tags: Iphone, Whatsapp alert, WhatsApp features