नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : ऑलिम्पिक्स जगातील सर्वात मोठी आणि भव्य स्पर्धा आहे. विविध देशातील खेळाडू विविध खेळांमध्ये सहभागी होतात. प्रत्येक जण आपल्या देशाला पदक मिळवून (Tokyo Olympics Medals) देण्यासाठी प्रयत्न करतात. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं, स्पर्धकासह त्या देशासाठीही अभिमानाची बाब असते. टोकयो ऑलिम्पिकच्या आयोजक समितीने 2019 मध्ये यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणारी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ ही पदकं कशी तयार केली जातात, याबाबत सांगण्यात आलं होतं.
खेळाडूंना मिळणाऱ्या पदकांमध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदकाचा समावेश असतो. ही पदकं जुन्या मोबाईल फोन्स (Recycled Mobile Phones) आणि इतर लहान इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून रिसायकल (Recycled Small Electronic Devices) करुन बनवली जातात.
यूट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, पदक बनवण्याची अशी प्रक्रिया 2017 पासून सुरू करण्यात आली होती. जपानच्या 1621 नगरपालिकांद्वारा 75 हजार टन सामान जमा करण्यात आलं होतं. जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ अँड टेलिफोन कॉर्पोरेशनने (NTT) जवळपास 62 लाख फोन जमा केले होते. ज्यात 5000 पदकांसाठी 32 किलो सोनं, 3,500 किलो सिल्व्हर आणि 2,200 किलो ब्रॉन्झ तयार करण्यात आलं होतं. हे वितळवून त्यापासून पदकं तयार केली गेली.
ऑलिम्पिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे जुन्या एलेक्टरनॉइक वस्तू रिसायकल करुन पदकं तयार करण्यात आली. अशाप्रकारे पदकं तयार करण्याची ही प्रक्रिया खेळाडूच्या मेहनतीचं प्रतिक असल्याचं आयोजक समितीचं म्हणणं आहे.
समितीने जपानच्या लोकांचेही आभार व्यक्त केले, ज्यानी आपले जुने फोन आणि इतर वस्तू देवून हा प्रयत्न यशस्वी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021, Tech news