नवी दिल्ली, 29 जुलै : अनेकदा युट्यूबवर (YouTube) व्हिडीओ पाहताना, व्हिडीओ अतिशय थांबत-थांबत, लोड होत सुरू राहतो. जर यामागे इंटरनेटचा स्लो स्पीड (Internet Slow Speed) हे कारण असेल, तर यासाठी अतिशय सोपी ट्रिक आहे. या ट्रिकद्वारे YouTube वर विना बफर व्हिडीओ पाहता येईल.
- सर्वात आधी व्हिडीओ प्लेअरमध्ये सेटिंगवर क्लिक करा.
- त्यानंतर काही पर्याय दिसतील. त्यामध्ये व्हिडीओची क्वालिटी 240p आणि 360p निवडा.
- या बदलानंतर जोपर्यंत ब्राउजर बंद करणार नाही, तोपर्यंत व्हिडीओ प्लेअर याच सेटिंगमध्ये पुढील व्हिडीओ चालवत राहील.
- व्हिडीओ सुरू करा आणि पुन्हा स्टॉप बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर व्हिडीओमध्ये स्टार्ट बटणावर क्लिक करण्याआधी व्हिडीओचा काही भाग लोड झाल्याचं दिसेल.
- जर कंप्यूटरचा वापर करत असाल, तर Chrome, Firefox ब्राउजरचा वापर करू शकता.
YouTube वर छोटे व्हिडीओ बनवून करता येणार मोठी कमाई, कंपनीची घोषणा
व्हिडीओ पाहण्याचा चांगला अनुभव देण्यासाठी YouTube व्हिडीओ स्ट्रीम क्वालिटीमध्ये बदल करतो. हे बदल युजरच्या व्हिडीओ पाहण्याच्या स्थितीनुसार आपोआप केले जातात. एखादा व्हिडीओ पाहताना, तुम्हाला त्याच्या क्वालिटीमध्ये जे बदल दिसतात, ते या स्थितीमुळेच दिसत असतात.
मुलं मोबाईलवर काय पाहतात? पालकांना ठेवता येणार लक्ष; YouTube चं नवं फीचर
दरम्यान, विना इंटरनेटही युट्यूबवर व्हिडीओ पाहता येऊ शकतात. 2014 मध्ये कंपनीने ऑफलाईन व्हयूइंग (Offline Viewing) फीचर दिलं होतं. या फीचरचा अँड्रॉईड आणि iOS युजर्सही वापर करू शकतात आणि व्हिडीओ सेव्ह करुन नंतर विना इंटरनेट कनेक्शन ते पाहता येतात. हे व्हिडीओ वायफाय नेटवर्क आणि मोबाईल डेटाच्या मदतीने सेव्ह करता येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Youtube, YouTube Channel