मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram वर Blue Tick साठी करू शकता अर्ज, वेरिफिकेशनसाठी असं करा अप्लाय

Instagram वर Blue Tick साठी करू शकता अर्ज, वेरिफिकेशनसाठी असं करा अप्लाय

इन्स्टाग्रामवरही तुम्ही Blue Badge अर्थात ब्लू टिकसाठी अप्लाय करू शकता.

इन्स्टाग्रामवरही तुम्ही Blue Badge अर्थात ब्लू टिकसाठी अप्लाय करू शकता.

इन्स्टाग्रामवरही तुम्ही Blue Badge अर्थात ब्लू टिकसाठी अप्लाय करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 मे : ट्विटरने (Twitter) ब्लू टिक (Blue Tick) वेरिफिकेशची सुरुवात केली आहे. परंतु इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) आधीपासूनच यासाठीच्या रिक्वेस्टचा पर्याय देण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरही तुम्ही Blue Badge अर्थात ब्लू टिकसाठी अप्लाय करू शकता.

इन्स्टाग्राम वेरिफिकेशसाठी तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंट सेटिंगमध्ये जा. इथे लिस्टमध्ये Account हा पर्याय दिसेल. इथे टॅप केल्यानंतर एक लिस्ट दिसेल. याच लिस्टमध्ये Request Verification पर्याय आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर वेरिफिकेश रिक्वेस्टचं पेज ओपन होईल.

इथे तुमचं पूर्ण नाव, कॅटेगरी आणि तुमचा आयडी अपलोड करावा लागेल. कॅटेगरीमध्ये अनेक ऑप्शन दिसतील, यात तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात ते सिलेक्ट करा. जर तुमचं प्रोफेशन यात नसेल, तर तुम्ही Other हा पर्याय निवडू शकता.

आयडी आणि फोटोही अपलोड करावा लागेल. इथे सरकारी आयडी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट कॉपी द्यावी लागू शकते. त्यावर तुमचा फोटो, जन्मतारीख आणि संपूर्ण नाव असावं. त्यानंतर इन्स्टाग्राम तुमचं अकाउंट रिव्ह्यू करेल. जर इन्स्टाग्रामला, तुम्ही वेरिफिकेशनसाठी पात्र आहात असं वाटलं, तर तुम्हाला Blue Badge मिळेल, अन्यथा मिळणार नाही.

(वाचा - Twitter ची मोठी घोषणा; Blue Tick साठी तुम्हीही करू शकता अर्ज, असं करा अप्लाय)

महत्त्वाची बाब म्हणजे, इंटरनेटवर असे अनेक फसवणूक करणारे आहेत, जे तुमचं इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट वेरिफाय करुन देण्याचा दावा करतात. त्यासाठी ते पैशांची मागणीही करू शकतात. परंतु अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. अशाप्रकारे पैसे मागणं, हा फसवणुकीचा प्रकार असून तुमचं अकाउंटही हॅक होण्याची किंवा बँक अकाउंट खाली होण्याचा धोका असतो.

(वाचा - WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, एक चूक आणू शकते अडचणीत)

कारण इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक कोणतीही सोशल मीडिया साईट अकाउंट वेरिफिकेशनसाठी कोणतेही पैसे घेत नाही. त्यामुळे जर अकाउंट वेरिफाय करण्याची इच्छा असेल, तर अधिकृतपणेच यासाठी रिक्वेस्ट करा, कोणालाही पैसे देऊ नका.

First published:

Tags: Instagram, Tech news, Twitter