• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Google Translate चा वापर करता का? हे डिटेल्स वाचाच

Google Translate चा वापर करता का? हे डिटेल्स वाचाच

भारताचा विचार केला तर सर्वाधिक सर्च केलेल्या 10 गोष्टींमध्ये Google Translate चा नंबर लागतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : जगभरातील अनेक नेटकरी गुगलचं सर्च इंजिन वापरतात. ते इंजिन वापरून जगभरातील माहितीचा खजिना एका क्लिकवर त्यांना उपलब्ध असतो. अनेकदा इंग्रजीतील शब्दांचे अर्थ समजत नाहीत मग त्यांना भाषांतर किंवा डिक्शनरीचा पर्याय गुगलमध्येच (Google) उपलब्ध असतो. अनेकदा एखाद्या भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करायचा असला की गुगलचं गुगल ट्रान्सलेट (Google Translate) वापरलं जातं. अनेक जण या अ‍ॅपचा वापर करतात. भारताचा विचार केला तर सर्वाधिक सर्च केलेल्या 10 गोष्टींमध्ये Google Translate चा नंबर लागतो. या सेवेत तुम्ही टेक्स्ट, डॉक्युमेंट्स आणि वेबसाइट्स (Text, Documents, Websites) एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित केली जातात. वेबसाइट आणि मोबाईल ॲपमध्येही गुगल ट्रान्सलेट वापरता येतं. Google कंपनीने Google Translate एप्रिल 2006 मध्ये सुरु केलं. त्या वेळी युनायटेड नेशन्स आणि युरोपियन पार्लमेंटमधील कागदपत्रं आणि ट्रान्सस्क्रिप्ट (Transcripts) यांच्या मदतीने भाषांचा डेटा तयार करण्यात आला. एवढाच उपयोग तेव्हा केला जात होता आता मात्र सगळं जग गुगल ट्रान्सलेट वापरतं.

  PhonePe युजर्सला झटका! आता वॉलेटमधून Online Transaction करणं महागणार

  Google Translate चा विस्तार 2016 मध्ये झाला. नवं तंत्रज्ञान (GNMT) वापरून एकदम अख्खं वाक्य अनुवादित करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. पहिल्यांदा कुठल्याही भाषेचं इंग्रजी भाषांतर व्हायचं मग दुसऱ्या भाषेत भाषांतर व्हायचं. आज 100 हून अधिक भाषांचं एकातून दुसऱ्या भाषेत भाषांतर केलं जातं. तुम्ही Google Translate मध्ये तुमच्या भाषेत एखादा शब्द टाइप करा (Written words translation) आणि तुम्हाला ज्या भाषेत त्याचा अनुवाद हवा आहे ती भाषा निवडा आणि एंटर करा त्या भाषेत तो शब्द भाषांतरित होईल. Google Translate मध्ये Website Translation पण करता येतं. तुम्हाला ज्या वेबपेजचं ट्रान्सलेशन करायचं आहे त्या पेजची लिंक तुम्ही गुगल ट्रान्सलेटमध्ये पेस्ट करा आणि एंटर करा ते संपूर्ण पान अनुवादित स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होईल.

  तुमचा फोन Hack झालाय? फोनमध्ये Malware आहे की नाही असं ओळखा

  गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्हाला व्हॉइस कमांड (Voice Command) देऊनही ट्रान्सलेशन करता येतं. गुगल ट्रान्सलेटमध्ये व्हॉइसचा पर्याय निवडायचा आणि वाक्य उच्चारायचं. ते ऐकून गुगल ट्रान्सलेट त्याचा अनुवाद करतं. गुगल ट्रान्सलेटमध्ये Documents चा पर्याय उपलब्ध आहे त्यावर क्लिक करून तुम्ही doc, dox, pdf, txt, ppt आणखी काही फॉरमॅटमधील फाइल्सचा अनुवाद करू शकता. Google Translate अनुवादासाठी सर्वांत उपयुक्त असं टूल आहे. यात केलेला अनुवाद अचूक असतो असं नाही तरीही जगभरात रोज लक्षावधी लोक या सेवेचा फायदा घेतात. Google Translate ने केलेल्या अनुवादावर एक नजर टाका आणि तो नीट करून घ्या. यामुळे तुमचं काम सोपं होईल.
  First published: