Home /News /technology /

विना इंटरनेट असं वापरा गूगल मॅप; ऑफलाईन GPS वापरण्याची सोपी ट्रिक

विना इंटरनेट असं वापरा गूगल मॅप; ऑफलाईन GPS वापरण्याची सोपी ट्रिक

गूगल मॅपच्या ऑफलाईन मॅप ऑप्शनच्या मदतीने युजर्सला विना इंटरनेट जीपीएसचा ऑफलाईन वापर करता येऊ शकतो.

    नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : इंटरनेट युजर्सकडून गूगल मॅपचा Google Map मोठ्या प्रमाणात वापर होतो. स्मार्टफोनद्वारे मिळणाऱ्या या जीपीएस GPS सर्व्हिसने लोकेशन शेअर करण्यासह, मार्क केलेल्या लोकेशनवरही योग्यरित्या पोहचता येतं. कोणत्याही नव्या ठिकाणी, लोकेशनवर असल्यास गूगल मॅप सर्वात कामाच्या नेव्हिगेशन टूल्सपैकी एक ठरु शकतो. प्रत्येक वेळी गूगल मॅप किंवा नेव्हिगेशन सर्व्हिस युजर्सची मदत करुच शकेल असं नाही. खासकरुन ज्यावेळी स्मार्टफोनमध्ये इंटरनेट सुरु नसेल किंवा सेल्युलर नेटवर्क येत नसल्यास समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत युजर्सला ऑफलाईन जीपीएसचा offline GPS वापर करता येऊ शकतो. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. अँड्राईड डिव्हाईस किंवा आयफोनवर ऑफलाईन जीपीएस वापरण्यासाठी किंवा मॅप एक्सेस करण्यासाठी युजर्सला आधी लोकेशन सेव्ह करावं लागेल. आता दुसऱ्याचं WhatsApp स्टेटस डाऊनलोड करता येणार गूगल मॅपच्या ऑफलाईन मॅप ऑप्शनच्या मदतीने युजर्सला विना इंटरनेट जीपीएसचा ऑफलाईन वापर करता येऊ शकतो. याच्या मदतीने एखाद्या लोकेशनचा मॅप स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच डाऊनलोड किंवा सेव्ह केला जाऊ शकतो. कोट्यवधी इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी, ऍपल, मायक्रोसॉफ्टकडून धोक्याचा इशारा - स्मार्टफोनमध्ये गूगल मॅप ओपन करा. - त्यानंतर डाव्या बाजूला वर असलेल्या आपल्या प्रोफाईल फोटोवर टॅप करुन ऑफलाईन मॅप सिलेक्ट करा. - त्यानंतर 'सिलेक्ट यूअर ओन मॅप'वर टॅप करा आणि जेथे जायचं आहे, ते लोकेशन निवडा. - त्यानंतर मॅप डाऊनलोड होईल आणि युजर्स ऑफलाईन ऍक्सेस करु शकतात.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या